vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा नगरपरिषदेचा सन्मान- ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024 सुपर स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम- 20 ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये कामगिरी- कचरामुक्त शहराचे पंचतारांकित मानांकन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा नगरपरिषदेचा सन्मान- ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024 सुपर स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम- 20 ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये कामगिरी- कचरामुक्त शहराचे पंचतारांकित मानांकन

सांगली, प्रतिनिधी : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये विटा नगरपरिषदेने 20,000 ते 50,000 लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान पटकावले असून, यासाठी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते व केंद्रीय गृहनिर्माण नगर विकास मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालिका प्रशासनाला सन्मानित करण्यात आले. राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव नगरविकास विभाग-2 डॉ. के. एच. गोविंदराज, राज्य मिशन डायरेक्टर स्वच्छ महाराष्ट्र शहरी नवनाथ वाठ, विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

विटा शहराच्या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाल्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा नगरपरिषदेचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ करिता गुणांकन पध्दती बदललेली असून ‘सुपर स्वच्छ लीग’ ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ पर्यंत जी शहरे सलग तीन वर्षे रँकमध्ये आहेत, अशा शहरांसाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली. यामध्ये 20 हजार ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये विटा शहराने सुपर स्वच्छ मानांकन मिळवले असून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे विटा शहराने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका कायम फडकवत ठेवली आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे पंचतारांकित (5 स्टार) मानांकन’ तसेच हागणदारी मुक्त कॅटेगरीमध्ये ODF++’ मानांकनही विटा शहराने कायम राखले आहे.

प्रशासक डॉ. विक्रम बांदल यांनी या यशाचे श्रेय लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद, शहर स्वच्छ ठेवण्याकरिता अहोरात्र झटणारे स्वच्छतामित्र, सामाजिक संस्था, महिला बचत गट, पत्रकार बंधू, तरुण मंडळे, सर्व शाळा महाविद्यालय शिक्षक व विद्यार्थी, स्वच्छताप्रेमी विटेकर नागरिक, विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व असोसिएशन, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, सर्व कंत्राटदार अशा सर्व सक्रिय सहभाग दिलेल्या घटकांना दिले.

 विटा शहराचा समावेश स्वच्छतेत सातत्य राखणाऱ्या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये होणे ही प्रत्येक विटेकर नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमप्रसंगी स्वच्छता निरीक्षक नारायण शितोळे, वाहन व्यवस्थापक आनंदा सावंत, नितीन टकले, अनिल पवार, अर्जुन सूर्यवंशी, दीपक सातपुते हेदेखील उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पत्रकार दिनः जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादनचौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर

बिहार मधील दुर्दैवी घटना होम गार्डच्या परीक्षेदरम्यान तरुणी बेशुद्ध; रुग्णालयात नेत असताना अम्ब्युलन्समध्येच चौघांकडून सामूहिक बलात्कार

तंबाखुमुक्ती जनजागृती बाईक रॅलीस प्रतिसाद

जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta