vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बिहार मधील दुर्दैवी घटना होम गार्डच्या परीक्षेदरम्यान तरुणी बेशुद्ध; रुग्णालयात नेत असताना अम्ब्युलन्समध्येच चौघांकडून सामूहिक बलात्कार

बिहार मधील दुर्दैवी घटना होम गार्डच्या परीक्षेदरम्यान तरुणी बेशुद्ध; रुग्णालयात नेत असताना अम्ब्युलन्समध्येच चौघांकडून सामूहिक बलात्कार

राज्य प्रतिनिधी बिहार मधील घटना होम गार्डची परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शारिरीक चाचणीदरम्यान बेशुद्ध पडल्याने तरुणीला रुग्णालयात नेलं जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धावत्या रुग्णवाहिकेत तिच्यावर बलात्कार करत माणुसकीला काळीमा फासण्यात आला आहे. बिहारच्या गया जिल्ह्यात ही घटना घडली असून, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

24 जुलै रोजी बोधगया येथील बिहार मिलिटरी पोलिस मैदानावर सुरू असलेल्या होमगार्ड भरती सरावादरम्यान हा कथित बलात्कार झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भरतीसाठी प्रक्रियेचा एक भाग असलेल्या शारीरिक चाचणी दरम्यान तरुणी बेशुद्ध पडली होती. यानंतर तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. तरुणीने आपण बेशुद्धावस्थेत असताना अनेकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

तरुणीच्या तक्रारीच्या आधारे बोधगया पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाठवण्यात आलं आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर काही तासातच एसआयटीने रुग्णवाहिकेचा चालक विनय कुमार, तंत्रज्ञ अजित कुमार या दोन संशयितांना अटक केली आहे. दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील सीसीटीव्हींच्या आधारे रुग्णवाहिकेच्या मार्गाची आणि वेळेची माहिती मिळवण्यात मदत झाली.

पोलीस तक्रारीतील माहितीनुसार, तरुणीने सांगितलं आहे की, मैदानात शारिरीक चाचणी सुरु असताना तिची शुद्ध हरपली. प्रवासात असताना आपल्याला लैंगिक अत्याचार होत असल्याचं लक्षात आलं. यानंतर तिने पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाला याची माहिती देत, तीन ते चार जणांनी बलात्कार केल्याचं सांगितलं.

या घटनेवर लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) खासदार चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली असून बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर टीका केली आहे. तसंच राज्य पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 16 जूनपासून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मुख्यमंत्री विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या श्री मोरया प्रतिष्ठान च्या गणेश सभा मंडपाचे  उद्घाटन

विधान परिषद प्रश्नोत्तरे :उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी- मंत्री उदय सामंत

नागरिकांनी ई-कचरा संकलन अभियानात सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम संपन्न

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी