vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई…

मुंबई, प्रतिनिधी: बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे धडक मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान अवैधरित्या चालणाऱ्या ९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ८५ वाहने (बाईक टॅक्सी) अटकावून ठेवण्यात आली आहेत व अवैध अग्रीगेटरविरुध्द फौजदारी गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे.

मुंबई महानगरात अपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. ही प्रवासी वाहतूक परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे करुन शासनाची व प्रवाशांची फसवणूक करुन राजरोसपणे सुरु असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ मधील तरतुदीनुसार मोटार व्हेईकल अॅग्रीग्रेटर पॉलिसीनुसार अप बेस प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक असताना सध्या या कंपन्यांकडून अशा कुठल्याही तरतुदींचे पालन न करता विना परवानगी प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे आढळले.

00000

संबंधित पोस्ट

मोफत वीज सवलत व गणेश उत्सव भत्ता योजना लाभासाठी अर्ज मागविले

मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत…

उमेद’ विभागीय, जिल्हा मिनी सरस महोत्सवाची सांगता;सांस्कृतिक कार्यक्रम, विक्री व प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी**•महाराष्ट्रात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta