vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खतटंचाईचा मुद्दा गंभीर, कृषी विभागाकडून दुर्लक्ष; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा…

खतटंचाईचा मुद्दा गंभीर, कृषी विभागाकडून दुर्लक्ष; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- सध्या खरीप हंगामातील पिकांना योग्य वाढीसाठी खतांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही युरिया, डीएपी यासारखी नामांकित कंपन्यांची खते मिळत नसल्याची गंभीर स्थिती आहे. दुसरीकडे, काही खत विक्रेते मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवत आहेत, तर कृषी विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी केला आहे.आज त्यांनी तालुक्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, बाजारात नामांकित कंपन्यांची खते उपलब्धच नाहीत. जी खते शेतकऱ्यांना नको आहेत, ती जबरदस्तीने दिली जात आहेत. काही दुकानदार तर ‘खत आलेच नाही’ असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत, तर दुसरीकडे जिथे खते उपलब्ध आहेत तिथे ती एमआरपीच्या पलीकडे विकली जात असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

शेतकऱ्यांच्या या समस्यांबाबत सोळुंके पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “कृषी विभागाचे अधिकारी खत वाटपावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात खते मिळणे अत्यावश्यक आहे, अन्यथा पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. खतांची टंचाई निर्माण होऊन त्याचा फायदा दुकानदार घेत आहेत आणि सरकार डोळेझाक करत आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जर लवकरच ही परिस्थिती सुधारली नाही आणि खताचा नियमित व पारदर्शक पुरवठा सुरू झाला नाही, तर अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्यावतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा तीव्र इशारा शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी दिला आहे. कृषी विभाग आणि प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाकडूनही करण्यात आली.

संबंधित पोस्ट

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

vishwatmaklokswamivarta

परिवर्तनवादी गीते, प्रबोधनात्मक व्याख्यान.. यंदाची भीमजयंती ठरणार विचारांचा महोत्सव! सार्वजनिक जयंती उत्सव समितीची जय्यत तयारी; अध्यक्ष निलेश राऊत यांची माहिती …

जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपणासाठी नवी मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देणार वृक्षरोपे

कृपया प्रसिद्धीसाठी ! मंदिरांमधील ‘पेड दर्शन’ सुविधा बंद करा आणि देवस्थानांमध्ये राजकीय नियुक्त्या नकोत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह  राज्यातील २२ जिल्ह्यांतून १ हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांची शासनाकडे जोरदार मागणी देवस्थानांच्या भूमींचे रक्षण करण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट राज्यात तात्काळ लागू करा !

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी अशोक काकडे- एकूण 291 मतदान केंद्रांवर होणार मतदान, मतदारसंख्या अडीच लाखाहून अधिक 

vishwatmaklokswamivarta