vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक पदी सौ सीमाताई आठवले यांची नियुक्ती* 

*रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक पदी सौ सीमाताई आठवले यांची नियुक्ती*

मुंबई प्रतिनिधी ~ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )पक्षाच्या महिला आघाडीच्या राजकीय मार्गदर्शक पदी सौ सीमाताई आठवले यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक नुकतीच नवी दिल्ली आयोजित करण्यात आली होती या बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून सीमाताई आठवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मंजू छीबेर यांची अधिकृत निवड करण्यात आल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी जाहीर केले

सौ.सीमाताई आठवले या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुविद्य पत्नी आहेत. यांनी अनेक वर्ष रिपब्लिकन महिला आघाडीला मार्गदर्शन केलेले आहे. सौ सीमाताई आठवले यांच्या मार्गदर्शनात रिपब्लिकन महिला आघाडीचे संघटन वेगाने वाढून मजबूत झालेले आहे त्यामुळे सीमाताई आठवले यांची रिपब्लिकन महिला आघाडीच्या राजकीय मार्गदर्शक पदी निवड झाल्याने देशभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील महिला आघाडीच्या उपाध्यक्ष नैनाताई वैराट यांनी सीमाताई आठवले यांची महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक महिला कार्यकर्त्यांनी सौ सीमाताई आठवले यांचे महिला आघाडीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून देशभरातून सौ सीमाताई आठवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

000000

संबंधित पोस्ट

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

हिंद-दी-चादर’ निमित्त नवी मुंबईत सखोल स्वच्छता मोहीमा…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत १०० टक्के कामकाज पूर्ण

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा