vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –           पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…

छत्रपती संभाजीनगर,द प्रतिनिधी) – सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायदा 2003 (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण) यानुसार कायद्याचे उल्लंघन होणाऱ्या ठिकाणी तसेच धुम्रपान तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री ई सीगारचा वापर करू नये, यासाठी तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सनियंतत्रण समितीची त्रिमासिक आढावा बैठक पोलीस उपायुक्त कार्यालयात घेण्यात आली.

या बैठकीस डॉ. जितेंद्र डोंगरे, आरोग्य विभाग, डॉ .वरद शिंदे, महानगर पालिका आरोग्य विभाग डॉ लक्ष्मी पीसरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, ग्रामीण विभागाचे पोलिस निरीक्षक श्री. शिंदे, डॉ.जावेद कुरेशी, जिल्हा सल्लागार समिती सदस्य म्हळगे बैठकीस उपस्थित होते. तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या व्यसनाधीन तेच प्रमाण वाढले असून ते नियंत्रणात आणण्यासाठी तंबाखू नियंत्रण कक्षा मार्फत व्यसनधीनतेचे दुष्परिणाम याविषयी जाणीव जागृती करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनाही मार्गदर्शन करावे .त्याचबरोबर पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करून याबाबतचे प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक आहे.अवैध गुटखा विक्री तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री यावर नियंत्रण करावे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या विविध टपऱ्या यावर कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थाची, व्यसनाधीन करणाऱ्या पदार्थाची विक्री प्रतिबंधित करण्यासंदर्भात ची कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षा मार्फत देण्यात येणाऱ्या पोलीस स्टेशनला चलनपुस्तिका मार्फत अवैध कृती करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करून त्याचा अहवाल प्रत्येक महिन्याला सादर करावा. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात तंबाखूमुक्त कार्यालयाचे फलक लावण्यात यावेत. कोणत्याही कार्यालयात तंबाखू सेवन होत असेल तर तेथे दंडात्मक कारवाई करण्यात यावी, यासाठी वेळोवेळी पथकाने, बाजारपेठ,गर्दीचे ठिकाण, कार्यालये, हॉटेल, चहा टपरी येथे मोहीम हाती घेण्याचे निर्देश पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी बैठकीत दिले.

00000

संबंधित पोस्ट

आपले सरकार पोर्टलसंबंधी प्रशिक्षणाचे आज आयोजन

जिल्ह्यास अतिवृष्टीचा येलो अलर्ट नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन