vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

एपीटी ॲप्लिकेशन प्रणालीसाठी आज पोस्टल व्यवहार बंद

एपीटी ॲप्लिकेशन प्रणालीसाठी आज पोस्टल व्यवहार बंद

सांगली, प्रतिनिधी: डाक विभागात एपीटी अप्लिकेशन ही सुधारित प्रणाली सांगली व मिरज मुख्य डाकघर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपडाकघरांमध्ये तसेच शाखा डाकघरांमध्ये दि. 5 ऑगस्ट ऐवजी आता दि. 4 ऑगस्ट 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रगत डिजीटल प्लॅटफॉर्मकडे सुरळीत आणि सुरक्षित संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी दिनांक दि. 4 ऑगस्ट ऐवजी दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित डाऊनटाईम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी कोणतेही पोस्टल व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होणार नाहीत. या सुधारित वेळापत्रकाची सर्वांनी नोंद घ्यावी, असे प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

     ही तात्पुरती सेवा स्थगिती डेटा स्थलांतर प्रणाली पडताळणी आणि संरचना प्रक्रियेसाठी आवश्यक आहे, जेणेकरून नवीन प्रणाली सुरळीत आणि कार्यक्षमतेने सुरु करता येईल. APT ॲप्लिकेशनचा उ‌द्देश सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक स्नेही इंटरफेस प्रदान करणे आहे. जी अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि भविष्यातील डाकसेवा देण्याच्या कटिबद्धतेचा भाग आहे.

      ग्राहकांनी आपल्या भेटीचे पूर्वनियोजन करावे आणि या तात्पुरत्या अडथळ्यात सहकार्य करावे. या सर्व गोष्टी प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या जलद आणि डिजिटल सक्षमीकरणाच्या सेवा देण्यासाठी घेतल्या जात आहेत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी भरती12 नोव्हेंबर, 2025 रोजी थेट मुलाखत

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदतपदवीधरांनी व शिक्षकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिनस्त सात गाळे भाडे तत्वावर देण्यात येणार§ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी यांना संधी§ अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत..

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा…

बारामती तालुक्यात अतिवृष्टीमुळे काटेवाडी परिसरातून ७ आणि शहरातून १ अशा ८ नागरिकांची सुखरूप सुटका. नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर. 

बुधवारी आंबा महोत्सव: प्रदर्शनी व विक्री