vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची उपस्थिती,दिप ज्योत हातमाग खादी उद्योगाची भरारी!

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची उपस्थिती,दिप ज्योत हातमाग खादी उद्योगाची भरारी!

राज्य प्रतिनिधी जालना : दिप ज्योत हातमाग खादी उद्योगाने अल्पवधीतच आपली भरारी ही मुंबईच्या सहकार परिषदेपर्यंत गेली आहे. सहकार परिषदेपर्यंत या उद्योगाला नेण्यासाठी आमदार तथा शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या सोबतच भाऊसाहेब घुगे हे सुध्दा होते. 16 जुलै 2025 स्व. यशवंतराव चव्हाण सेन्टरमध्ये ही सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आता उद्या क्रांतीकारक स्व. अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून त्यानिमित्ताने शांतीलालजी लोंढे यांनी खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आ. अर्जुनराव खोतकर, सहकार सेवेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, शिवसेनेच्या उपनेत्या तथा सहकार सेवेच्या कार्याध्यक्ष आशाताई विचारे- मामाडि, भाऊसाहेब घुगे, मार्गदर्शक किरण गरड तसेच दिनेश लोंढे, शोभाताई लोंढे, निरज लोंढे, प्रतापराव बनकर, विशाल साळवे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

एका मातंग समाजातील व्यक्तीला एवढ्या मोठ्या उंची नेणारे आ. खोतकर यांचे तर आभार आहेतच. दिप ज्योत हातमागच्या कपड्याविषयी सांगतांना शांतीलाल लोंढे म्हणाले की, कॅन्सरपासून तर हा कपडा तर वाचतो पण त्याच बरोबर कसलीही दुर्गधीं नाही, आणि या बेडसीटवर झोपल्यानंतर आपल्या खाज सुध्दा येत नाही. हा कपडा पूर्णपणे हाताने बनलेला असून यात कसलेही केमिकल किंवा लिक्वीड नाही. पूर्णपणे हाताने तयार केलेला हा कपडा असून याबापासून कसलाही तोटा नाही. प्रत्येकानेच हा कपडा वापरला, अशी आपली प्रांजळ इच्छा असल्याचेही लोंढे सांगतात. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपली मुलचं हा व्यवसाय पुढे नेणार आहेत. त्यांना उद्योग मंडळाकडून नुकतेच कर्ज देखील मंजूर झालेले आहे. आपल्या उद्योगाने मुंबईपर्यंत झेप मारली. परंतू हाच उद्योग आता दुबईला होणार्‍या सहकार परिषदेमध्ये जाणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आ. अर्जुनराव खोतकर, सहकार सेवेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, शिवसेनेच्या उपनेत्या तथा सहकार सेवेच्या कार्याध्यक्ष आशाताई विचारे- मामाडि, भाऊसाहेब घुगे, मार्गदर्शक किरण गरड तसेच दिनेश लोंढे, शोभाताई लोंढे, निरज लोंढे, प्रतापराव बनकर, विशाल साळवे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

दिप ज्योत हातमागमध्ये सध्या टॉवेल, बेडसिट, रुमाल, साडी, शाल, शर्ट पीस, बँग, धोती- दुपट्टा, आणि मोदी जॉकेट बनत आहे. हे सर्वच कपडे प्रत्येकाच्याच उपयोगाचे आहेत.

संबंधित पोस्ट

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी

जागतिक कावीळ दिन जनजागृती रॅली संपन्न कावीळ संसर्ग कमी करण्यासाठी समाजाचा सहभाग महत्वाचा- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत १६ विद्यार्थी व कुटुंबीयांना लाभ मंजूर

रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज (IMD)

कर्जत – जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना“वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने” अंतर्गत१०० लाख रुपयांचा निधी मंजूर,विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

लातूर येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे-. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta