vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कामगारांचा एल्गार! ११ ऑगस्टपासून सामाजिक वनीकरण विभागावर आंदोलनाचा इशारा”

कामगारांचा एल्गार! ११ ऑगस्टपासून सामाजिक वनीकरण विभागावर आंदोलनाचा इशारा”

जालना, प्रतिनिधी:जालना जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत मजुरांचे वेतन, ओळखपत्र, नोंदणी व अन्य मूलभूत हक्क गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या गंभीर प्रश्नांवर शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे मराठवाडा सर्व श्रमिक संघटना, जालना शाखेच्या वतीने दिनांक ११ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत धरणे उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.हा निर्णय दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी संघटनेच्या ट्रेड युनियन कार्यालय, लकडकोट, जालना येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. सोहम प्रकाश बोदवडे (संयुक्त सचिव, मराठवाडा सर्व श्रमिक संघटना) होते. त्यांच्यासोबत कॉ. शंकर लोखंडे (तालुका अध्यक्ष), कॉ. गणेश जाधव (तालुका उपाध्यक्ष), कॉ. गुलाब जाधव (तालुका सचिव) व इतर मजूर उपस्थित होते.

या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, १६/०७/२०२५ रोजी विभागीय सामाजिक वनीकरण कार्यालय, जालना यांना सादर करण्यात आलेल्या मागण्यांचे अजूनही निराकरण झालेले नाही. त्यामुळे ०४/०८/२०२५ रोजी एक स्मरणपत्र देण्यात आले असून त्याद्वारे विभागाला दिनांक ११/०८/२०२५ पासून बेमुदत धरणे उपोषण आंदोलन होईल अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या:1. २०१८ ते २०२४ दरम्यान प्रलंबित असलेले मजुरांचे सर्व वेतन तातडीने अदा करावे.2. सर्व कामगारांना अधिकृत ओळखपत्र, नोंदणी हजेरी व काम प्रमाणपत्रे त्वरित प्रदान करावीत.3. मजुरांच्या शोषणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.4. विभागातील मजुरांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी स्थायीत्व व नियमितीकरणाचा प्रस्ताव शासनाला सादर करावा.5. मजुरांच्या मागण्यांबाबत लिखित स्वरूपात निर्णय व कार्यवाही अहवाल त्वरित जाहीर करावा.

संघटनेचा स्पष्ट इशारा:> “मागण्या मान्य होईपर्यंत धरणे उपोषण मागे घेण्यात येणार नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेचा तीव्र निषेध करत आम्ही हा लढा कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने पुढे नेऊ. मागण्यांकडे प्रशासनाने पुन्हा दुर्लक्ष केल्यास, आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. विभागीय कार्यालयासमोर कामगारांचा व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल. यामुळे उद्भवणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नास जबाबदार संबंधित प्रशासनच राहील.”— कॉ. सोहम बोदवडे, संयुक्त सचिवसर्व मजुरांना संघटनेचे आवाहन:जालना जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागाशी संबंधित सर्व कामगारांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजीपासून सुरू होणाऱ्या बेमुदत धरणे उपोषण आंदोलनात सामील होऊन आपल्या हक्कासाठी संघटनेच्या नेतृत्वाखाली एकजुटीने उभे राहावे.— मराठवाडा सर्व श्रमिक संघटना, जाल..

.000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

लातूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि  वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- ‘टेक वारी’तील ज्ञानाचा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी घेत आहेत ऑनलाईन लाभ

व्यायाम साहित्य व क्रीडा साहित्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील जनतेला रमजान ईदच्याशुभेच्छा,मानवकल्याण, विश्वबंधुत्वासह सामाजिक ऐक्याचा संदेश जगाला देऊया – उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार