vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मेरा रेशम मेरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

मेरा रेशम मेरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

जालना, प्रतिनिधी :- मेरा रेशम मेरा अभिमान या अभियांनातर्गत महाराष्ट्र राज्यातील एकुण 8 जिल्ह्यांची धाराशिव, बीड, जालना, सांगली, सोलापुर, पुणे, भंडारा व वर्धा निवड या कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात एकुण 8 कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असुन आतापर्यंत 4 कार्यक्रम पुर्ण करण्यात आले असुन त्यांअतर्गत 204 शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यात आले आहे व 18 जुलै रोजी चांदई ईको ता.भोकरदन, 29 जुलै रोजी अकोले निकळक ता.बदनापुर , 1 ऑगस्ट रोजी खांडवी ता.परतुर, 5 ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, 13 ऑगस्ट रोजी डुनगाव ता.अंबड, 13 ऑगस्ट रोजी बोरगाव ता.घनसावंगी, 21 ऑगस्ट रोजी म.चिंचोली ता.घनसावंगी, 1 सप्टेंबर रोजी आपेगाव ता.अंबड येथे रेशीम जागृकता, रेशीम प्रशिक्षण, रेशीम प्रात्यक्षिक आदि कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे

जागतिकस्तरावर चीन हा सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे. त्यानंतर भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो. परंतु गेल्या चार वर्षात चीन देशाचे रेशीम उत्पादनात सातत्याने घट होवून आता पुर्वीच्या तुलनेत 50 टक्के झाले आहे. त्यामुळे भारत देशाला रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रेशीम व प्रक्रीया उद्योगाचा भारत देशामध्ये विकास व्हावा, रेशीम उद्योगातील तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहोचावे व शेतकऱ्यांच्या अडचणी शासनास माहिती होण्यासाठी विभागाच्या व शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संशोधन करता यावे याकरीता केंद्रीय रेशीम मंडळ यांनी राज्य शासनाचा सहभाग घेवून संपुर्ण देशात एकाच वेळेस ‘मेरा रेशम मेरा अभिमान’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सदरचा कार्यक्रम 100 दिवसांचा असुन यामध्ये केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ तसेच रेशीम विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावोगावी जावून, रेशीम जागृतता, रेशीम तंत्रज्ञान प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आदि कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांपर्यंत रेशीम तंत्रज्ञानाचा प्रसार करतील. यामध्ये संपुर्ण भारत देशातील 28 राज्यामध्ये एकुण 129 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असुन 128 शास्त्रज्ञासह एकुण 288 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहे त. या मोहिमेचा कालावधी जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर -2025 असुन एकंदरीत 1 लक्ष लोकांपर्यत माहिती पोचविण्याचा लक्षांक निर्धारित करण्यात आला आहे.

5 ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे कार्यक्रम संपन्न

मेरा रेशम मेरा अभिमान कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेले रेशीम प्रशिक्षण तसेच जागृकता कार्यक्रमास केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ अंकुश गाडगे यांनी ‘रेशीम किटक संगोपन तंत्रज्ञान’ या विषयावर तसेच रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी ‘तुती बाग व्यवस्थापन व शासकीययोजनेविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामुळे रेशीम शेती करण्यास नवीन शेतकऱ्यांनी नोंदणी केली तसेच रेशीम शेती करत असलेल्या शेतकऱ्यांच्या तांत्रिक व योजना विषयी अडचणी सोडविण्यात आल्या. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था जिल्हा रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहाय्यक गोविंद गिते तसेच केंद्रीय रेशीम मंडळाचे तांत्रिक सहाय्यक श्रीमती अंजली नागे व श्रीमती पुष्पा गणबास यांनी केले.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राज्यातील जनतेला रमजान ईदच्याशुभेच्छा,मानवकल्याण, विश्वबंधुत्वासह सामाजिक ऐक्याचा संदेश जगाला देऊया – उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार 

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

अनधिकृत शाळांपासून सावध राहा, फक्त शासन मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्या- शिक्षणाधिकारी प्राथमिक), बाळासाहेब राक्षे”

जालन्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…