vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अनधिकृत शाळांपासून सावध राहा, फक्त शासन मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्या- शिक्षणाधिकारी प्राथमिक), बाळासाहेब राक्षे”

अनधिकृत शाळांपासून सावध राहा, फक्त शासन मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्या- शिक्षणाधिकारी प्राथमिक), बाळासाहेब राक्षे”

जिल्हा प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे)– शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून, या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात शासन परवानगीशिवाय काही अनधिकृत शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.  या शाळांमधून राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी इत्यादी नामांकित बोर्डांच्या नावाखाली आकर्षक जाहिराती करण्यात येत असून त्यामुळे पालकांची फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे.     या संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक), बाळासाहेब राक्षे यांनी पालकांना सावध राहण्याचे आवाहन करत स्पष्ट केले आहे की “पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्यासाठी शाळेची शासन मान्यता आहे की नाही, याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावा. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस सर्वस्वी पालकच जबाबदार असतील.”

  बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 अंतर्गत अनधिकृत शाळांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरु राहणार नाही यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

अनधिकृत शाळांची यादी

१) अनिरुध्द हायस्कूल, व ज्यूनिअर कॉलेज कात्रप पनवेल हायवे बदलापुर (पु.), ता.अंबरनाथ, जि.ठाणे.

२) श्री.चेतन्य टेक्नो स्कूल सव्हें नं.77, आर्यन 1 ठाणेकर शिरगाव बदलापुर (पु.), ता.अंबरनाथ, जि.ठाणे.

३) स्टार लाईट्स इंटरनॅशनल स्कूल सोनिवली गांव, बदलापुर (प.), ता.अंबरनाथ ,जि.ठाणे.

४) नेसम इंग्लिश मिडीयम स्कुल, कडसावरे गांव, वांगणी (प.), ता.अंबरनाथ, जि.ठाणे.

५) रुद्र इंटरनॅशनल स्कूल,डोणे, वागंणी (प.),ता.अंबरनाथ, जि.ठाणे.

६) नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, वागंणी(प.), ता.अंबरनाथ, जि.ठाणे..७) जी.के.इंग्रजी हायस्कूल, मु.पो.खडवली, ता.कल्याण, जि.ठाणे.

८) लिओ हायस्कूल, काल्हेर, ता.भिवंडी, जि.ठाणे

९) नॅशनल इंग्लिश स्कूल, दापोडे, ता. भिवंडी, जि.ठाणे.१०) श्री.चैतन्य टेक्नो स्कूल सोनाळे, ता. भिवंडी, जि.ठाणे.११) विद्याप्रबोधनी इंग्लिश मिडीयम स्कूल झिडके (अंबाडी), ता.भिवंडी, जि.ठाणे.१२) डिझाईन ग्रेस हायस्कूल, वज्रेश्वरी, ता.भिवंडी,जि.ठाणे.१३) विनर्स इंग्लिश स्कूल, कांबे, ता.भिवंडी, जि.ठाणे.१४) अग्निमाता इंग्लिश स्कूल, पिंपळास, ता.भिवंडी, जि.ठाणे.१५) आर.एन.इंग्लिश स्कूल, कोन, ता.भिवंडी, जि.ठाणे

000

संबंधित पोस्ट

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीप्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज· ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

पोलादपूर, महाड, माणगाव तालुका क्रीडा संकुलाच्या कामास गती द्यावी- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

vishwatmaklokswamivarta