vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमीन विक्री प्रस्ताव आमंत्रितअनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी संधी:

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमीन विक्री प्रस्ताव आमंत्रितअनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी संधी:

गडचिरोली, प्रतिनिधी-सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना’ अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी शासनाकडून मदत करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना चार एकर जिरायती अथवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे.

गैर आदिवासी कुटुंबांकडून शेतजमीन खरेदी करण्यासाठी इच्छुक विक्रेत्यांकडून सन २०२५-२६ करिता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपली चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन विक्री करायची आहे, त्यांनी संबंधित पटवारी हद्दीनिहाय अर्ज संमती पत्रासह सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

जमीन विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रेविक्री प्रस्तावासोबत पुढील आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे:जमिनीचा ७/१२ उतारा आणि गाव नमुना ८प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र कुटुंबातील सर्व सदस्यांची (पत्नी, मुले, सख्खे भाऊ) जमीन विक्रीसाठी संमती व ना-हरकत प्रमाणपत्र

क्षेत्रफळाची मोजणी व नकाशासह टाचण अहवाल न्यायालयीन वाद नसल्याचे व नुकसान भरपाई न मागण्याचे १०० रुपये स्टॅम्पवर शपथपत्र व हमीपत्र जमिनीचे दर प्रचलित शासकीय दरांप्रमाणे किंवा जिल्हास्तरीय समितीद्वारे वाटाघाटीनंतर निश्चित केले जातील. मात्र, प्राप्त प्रस्तावांवरुन जमीन खरेदी करणे हे बंधनकारक असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट,सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ असून, इच्छुक शेतकऱ्यांनी वेळेत प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

परदेशात उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना; पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

ऐरोली येथे स्वयंरोजगार मेळावा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

चारा उपलब्धतेबाबत शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

किआने भारतात सादर केली प्रीमियम 7-सीटरची लक्झरी एस यु व्ही सिरोस- लॉन्च केली आहे पुढील वर्षी जानेवारी 2025 पासून त्याची बुकिंग सुरू…

vishwatmaklokswamivarta

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta