vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…

मुंबई, प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त “कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025” चे आयोजन महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार करणाऱ्या या महाकुंभचे उद्घाटन आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

कौशल्य, रोजगार , उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या महाकुंभात क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे अध्यक्षस्थानी असतील तर, कुस्तीवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने “कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025” चे आयोजन 13 ते 22 ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या महाकुंभात एकूण 16 प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा होणार असून, मल्लखांब, कबड्डी, खो-खो, भालाफेक, विटी – दांडू, कुस्ती, लगोरी, लंगडी, रज्जूमलखांब, पारंपरिक धाव स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे. पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार हे या स्पर्धांचे वैशिष्ठ आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरूस्ती, संघभावना आणि स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी या उपक्रमात जवळपास एक लाखांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यंदादेखील राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळाडू यात सहभागी होणार आहेत. यावेळी युवक-युवतींना पारंपरिक खेळांविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

०००

संबंधित पोस्ट

कमी खर्चात अधिक उत्पादनाचा मंत्र; कोरचीत ‘सगुणा भात शेती तंत्रज्ञान’ प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादशिकारी टोला येथे कृषी विभागाचा पुढाकार; पाण्याची बचत, मजुरीत कपात आणि उत्पादनवाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूक बंदी

स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा कायद्याविरोधात ३ एप्रिलला पत्रकारांचे मुंबईत आंदोलन…

पत्रकारांसाठी कार्यशाळा तज्ज्ञांनी सांगितले कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि शुद्धलेखनाचे मंत्र..

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन;• पुनर्वसनाला प्राधान्य देत २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

vishwatmaklokswamivarta