vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मलकापूर शहरातील गणेशोत्सव मिरवणुक व विसर्जनाच्या कालावधीत वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकारी यांचे आदेश

मलकापूर शहरातील गणेशोत्सव मिरवणुक व विसर्जनाच्या कालावधीत वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकारी यांचे आदेश

बुलढाणा, प्रतिनिधी दमलकापूर शहरात मोठ्या प्रमाणात ÿव साजरा करण्यात येतो. या कालावधीत गणेश मंडळाकडून मिरवणुक व विसर्जनाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील वाहतुक दि. 27 ऑगस्ट 2025 व दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.

 मलकापूर शहरातील गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी 12 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपावेतो तसेच दि. 6 सप्टेंबर रोजी 12 ते रात्री 12 वाजेपावेतो वाहतुक मार्गात पर्यायी व्यवस्था केली आहे.

पर्यायी मार्ग याप्रमाणे : बुलढाणा–दाताळा–मलकापूर मार्गे मुक्ताईनगर, नांदुरा, भुसावळकडे जाणारी वाहने दाताळा टोलनाका-घिणी-बेलाड-एनएच 53 वरुन, मुक्ताईनगर-धरणगाव-मलकापूर मार्गे-दाताळा-मोताळा-बुलढाणा जाणारी वाहने एनएच-53 ने बेलाड फाटा-बेलाड-घिणी-दाताळा-टोलनाका मार्गे बुलढाणा, एनएच-53 ने मलकापूर मार्गे दाताळा-मोताळा-बुलढाणा जाणारी वाहने एनएच 53 ने बेलाड फाटा-बेलाड-घिणी-दाताळा-टोलनाका मार्गे बुलढाणा, बोदवड-मलकापुर मार्गे मुक्ताईनगर नांदुरा-खामगांव जाणारे वाहने बोदखेडे-वानखेडे पेट्रोलपंप-दाताळा-घिर्णी-बेलाड-बेलाड नांदुरा-मुक्ताईनगर या पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना व वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून, आदेशाचे उल्लंघन झाल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

मुंबईतील स्वच्छता विषयक ‘सुविधा केंद्र’ उपक्रम पथदर्शी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· मुंबईत २४ केंद्रे, ९ प्रगतीपथावर· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ…

vishwatmaklokswamivarta

शहिद जवान गजानन मोरे यांना पुषचक्र अर्पण करुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले* अभिवादन* 

नाशिक जिल्ह्यात खळबळजनक  धक्कादायक!बातमी- गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपी अटक

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

पंजाब निवडणुका: लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील लाखा सिधानाला मिळाले राजकीय पार्टी चे तिकीट…

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाची अभिनव लोकजागर मोहीम जीमलगट्टा येथे अंधश्रद्धा निर्मूलन व वैद्यकीय उपचाराच्या प्राथमिकतेची दिली शपथ…

vishwatmaklokswamivarta