vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

खत विक्रीसाठी नवी एल-१ यंत्रणा अनिवार्य

खत विक्रीसाठी नवी एल-१ यंत्रणा अनिवार्य

द ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – खत विक्रेत्यांकडून खत विक्री करताना आता जुनी यंत्रणा न वापरता नवी एल-१ विक्री यंत्रणा वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय खत विभागाच्या सूचनेनुसार भारतीय आधार प्राधिकरणाने मानांकन दिलेली ही नवी यंत्रणा खत वितरणासाठी अत्यावश्यक आहे.

   जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व खत विक्रेत्यांनी नवी एल-१ विक्री यंत्रणा घेऊन ती कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. या मुदतीनंतर जुन्या यंत्रणेद्वारे खत विक्री बंद होणार असून सर्व खते केवळ एल-१ विक्री यंत्रणेद्वारेच वितरित केली जाणार आहेत.

     ठाणे जिल्ह्यात एकूण १५३ नवीन एल-१ यंत्रे कार्यान्वित करण्यात आली असून, यासाठी आरसीएफ (RCF) कंपनी नेमण्यात आली आहे. कंपनीकडून ही यंत्रे खत विक्रेत्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

     मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या यंत्रणेच्या अंमलबजावणीस गती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे खत वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व शिस्तबद्धता येणार असून शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळविणे सुलभ होईल.

 खत विक्रेत्यांनी २० ऑगस्टपूर्वी नवी एल-१ यंत्रणा कार्यान्वित न केल्यास त्यांना दुकानातून खत विक्री करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे.

 अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीतील कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद, ठाणे येथील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे

000

संबंधित पोस्ट

वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची 10 जून मुदत..

इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी,शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या-मतदार जनजागृती उपक्रमांची राज्य निवडणुक आयुक्तांकडून वाखाणणी

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त खिडक्या- खासदार नरेश म्हस्के यांचे प्रवासी संघटनेने मानले आभार