vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमाज कल्याण अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमाज कल्याण अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..

        मुंबई, प्रतिनिधी- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट–ब) पदावर निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले

   या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा महत्त्वाचा विभाग आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते. समाजातील सर्व घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत आपण सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. आपण सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकाच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

    सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, शासकीय सेवेत आल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. जनतेप्रती प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याचे कार्य आपल्या हातून होणार आहे. या संधीचे आपण सोने करावे, असे आवाहनही श्री. शिरसाट यांनी यावेळी केले.

 

****

संबंधित पोस्ट

पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण;रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग

वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी*-पालकमंत्री शंभूराज देसाई*

महास्ट्राईड अंतर्गत प्रोत्साहनात्मक निधीसाठी गुणवत्तापूर्ण कृती आराखडे तयार करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**कामगिरीआधारित निधी मिळविण्यावर भर; शासन निर्णयाचा अभ्यास करून नियोजन करण्याच्या सूचना*

12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न “करो योग रहो निरोग” नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे – पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप

अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक योगदान द्यावे – एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न- संयुक्त पथकाने दर महिन्याला तपासणी करावी- कारखान्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात