vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी* 

*लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी*

लातूर, प्रतिनिधी) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितताअबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी वजमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 23 ऑगस्ट,2025 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 6 सप्टेंबर,2025 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले,दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरतायेणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवाइतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवातयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करतायेणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळेसभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईलकिंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभावकरणे, सोंग आणणे, चित्रे, चिन्हे फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयारकरणे, त्यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे यास मनाई करण्यात आली आहे.जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थाराहण्यासाठी कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याहीएका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यातआली आहे. हा आदेश अंत्ययात्रा, विवाह, कामावरील पोलीस किंवा इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागूराहणार नाही. तसेच शस्त्रबंदी व जमावबंदी काळातसभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा, उपोषण यांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार हे पोलीसअधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील.त्यांनी परवानगी देण्यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परवानगीद्यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

जालना व छत्रपती संभाजीनगरमधील #प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा

vishwatmaklokswamivarta

लोकं नाही तर गडचिरोलीचा विकास धावत आहे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल**गडचिरोली महामॅरेथॉनमध्ये १४ हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*

vishwatmaklokswamivarta

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा थाटातजिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘मिशन परिवर्तन’ स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग….

vishwatmaklokswamivarta

बदलापूर येथे दि.18 फेब्रुवारी रोजी’नक्शा’ प्रकल्पाचा होणार शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta