vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र 

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र

रायगड, प्रतिनिधी. :कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व सोपा व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावर विविध सोयी-सुविधांनी युक्त अशी जनसुविधा केंद्रे उभारली आहेत. या केंद्रांमुळे भक्तांना प्रवासात कोठेही अडचण येणार नाही.

जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली असून, पळस्पे फाटा, खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड शहर आणि पोलादपूर (लोहारे) येथे ही केंद्रे कार्यरत असणार आहेत.

या जनसुविधा केंद्रांवर पोलीस मदत केंद्र व आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन,वाहन दुरुस्ती कक्ष, टायरमध्ये हवा भरण्याची सोय

वैद्यकीय कक्ष, अम्ब्युलन्स सेवा व मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार,बालक आहार कक्ष व महिलांसाठी फिडींग कक्ष,

मोफत चहा, बिस्कीट, पाणी व ओ.आर.एस. इत्यादी मिळणार आहेत.

000000

संबंधित पोस्ट

नसरापूर हत्या प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गतकारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गततीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

शेतकऱ्यांनी विमा संरक्षित ई-पीक पाहणी करुन घ्यावी