vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुण्यात सीएनजी हायड्रो टेस्टिंग दरात वाढ – रिक्षा चालक संघटनांचा आंदोलनाचा इशारा

पुण्यात सीएनजी हायड्रो टेस्टिंग दरात वाढ – रिक्षा चालक संघटनांचा आंदोलनाचा इशारा

राज्य प्रतिनिधी –

पुण्यातील खासगी वाहनधारक आणि रिक्षा चालकांत तीव्र नाराजी पसरली आहे. रिक्षाचालक संघटना यांनी ही समस्या त्वरीत सुटली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पुण्यात सीएनजी वाहनांच्या हायड्रो टेस्टिंगच्या दरात अचानक तब्बल चारपट वाढ झाली आहे. आधी पाचशे ते सातशे रुपयांच्या दरात होणाऱ्या या तपासणीचे शुल्क आता दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये इतके वाढले आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे पुण्यातील खासगी वाहनधारक आणि रिक्षा चालकांत तीव्र नाराजी पसरली आहे. रिक्षाचालक संघटना यांनी ही समस्या त्वरीत सुटली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हायड्रो टेस्टिंग ही दर तीन वर्षांनी सीएनजी सिलेंडरची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अनिवार्य असते. यात पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला जातो. राज्यभरात या तपासणीसाठी एकसारखा दर लागू असतानाही पुणे आणि मुंबईमध्ये याचे दर भिन्न असण्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे: या दरवाढीमुळे वाहनधारकांवर आणि रिक्षाचालकांवर आर्थिक ताण वाढलेला असून, वाढलेला खर्च जर सरकारने नियंत्रित केला नाही तर रिक्षा आणि टॅक्सी भाडेही वाढण्याची शक्यता असणार आहे. त्यामुळे या समस्येवर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर दरवाढीमुळे प्रवाशांवरही परिणाम होऊ शकतो कारण वाढलेल्या खर्चाची भरपाई भाड्यांद्वारे केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यामुळे या प्रकरणी सरकार आणि संबंधित विभागांनी त्वरित कदम उचलण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही हायड्रो टेस्टिंग आणि त्यावरील दरवाढीची माहिती पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि चिंता निर्माण झाली आहे.

संबंधित पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार-प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन* 

सोमवारी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन विमाशि संघाचे प्रलंबित समस्‍यांबाबत आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

वांद्रे मेट्रो लाईनखाली ‘बॉलीवूड थीम’ साकारण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील खळबळजनक वृत्त निवारागृहात तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी चर्चच्या मुख्य धर्मोपदेशकाला अटक..

ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन..

vishwatmaklokswamivarta