vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा

लातूर, प्रतिनिधी : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असून, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आगामी गणेशोत्सवात वाहतूक नियम जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. थोरात, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीळकंठ, अलका डाके, गणेश क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात लातूर शहर महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवावी. गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने प्रमुख ठिकाणी वाहतूक नियमांचे प्रबोधन करणारे देखावे आणि फलक लावण्याचे प्रयत्न करावेत. तसेच, जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर वेग मर्यादा, वळण रस्ते यांचे दिशादर्शक फलक योग्य ठिकाणी लावावेत. लातूर शहरातील प्रमुख चौकांतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका यांनी संयुक्त बैठक घेऊन लवकरात लवकर उपाययोजनांचा आराखडा सादर करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. रस्त्यांवरील दुभाजकांवर वाढलेली झाडे आणि झुडपे वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत यासाठी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच, लातूर आणि हरंगुळ रेल्वे स्थानकांवर रेल्वे आल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बैठकीत लातूर शहरातील रिक्षा थांबे आणि महामार्गावरील दिशादर्शक फलक आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली

*****

संबंधित पोस्ट

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया – 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन• उत्तरदायित्व ही केवळ पाच वर्षांतून एकदा येणारी निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे…• विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे; गडबड-गोंधळासाठीचे नव्हे…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालयात सामुहिक मतदान शपथ ग्रहण

vishwatmaklokswamivarta

धारावी काळा किल्ला येथे संत रोहिदास पुण्यतिथी व किर्तन सप्ताह दीप महोत्सव संपन्न

vishwatmaklokswamivarta

किनगाव राजाची लखन-दुर्गा ठरली रांजणी केसरीचे मानकरी*बैलजोडी मालाकला सतीश घाटगेकडून मिळाली दुचाकी भेट

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी स्वागत केले.