vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम

 सांगली, प्रतिनिधी – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली आणि सांगली हायस्कूल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध खेळ संघटना, त्यांचे खेळाडू यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. याप्रसंगी जिम्नॅस्टिक, हॉकी, कराटे, तायक्वांदो या खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 22 संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, एस टी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक सुनिल भोकरे, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

युवकांनी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

धारावी विभागात भाजपा आणि चेंजर बॉईज कबड्डी टीम* यांच्या वतीने दोन दिवसीय *भव्य कबड्डी स्पर्धा* चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यात आता दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाला सर्वसाधारण विजेतेपद, यजमान छत्रपती संभाजीनगर द्वितीय तर पुणे विभागाचा तिसरा क्रमांक..

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात राज्यस्तरीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न 🌟

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट स्पर्धेचा समारोप…

vishwatmaklokswamivarta