vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्रांचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान;उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्रांचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान;उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी परिषदेकडून ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेकडून जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक) कार्यालयास प्राप्त झाली असून, त्यांचे वितरण दि. 1 ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत होणार आहे. उमेदवारांनी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी(प्राथमिक) विकास पाटील यांनी केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा 11 केंद्रांवर घेण्यात आली होती. प्रमाणपत्र प्राप्त करताना उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक असून, त्यांना परीक्षा प्रवेशपत्र, गुणपत्रिका, डी.टी.एड/बी.एड उत्तीर्ण गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, माजी सैनिकांचा पुरावा (लागू असल्यास) तसेच आधार/पॅन/मतदार ओळखपत्र इत्यादी ओळखपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. सदर कागदपत्रांशिवाय प्रमाणपत्र दिल्या जाणार नाही. तसेच बुलढाणा परीक्षा केंद्रांवर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पेपर-1 व पेपर-2 ची यादी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

00000

संबंधित पोस्ट

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री मकरंद जाधव पाटील· पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धाजंली.

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर यांची नवी मुंबई महानगरपालिकेत आढावा बैठक…

vishwatmaklokswamivarta

आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रभावित झालेली विमान सेवा व विमान उड्डाणे सुरू

vishwatmaklokswamivarta

टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्राला भेट देत केंद्रीय वस्त्र मंत्रालय सचिव श्रीम. नीलम शमी राव यांच्याकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा 21 व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण; बुलढाणा कृषि विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta