vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन

मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन

      सांगली, प्रतिनिधी.) : जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली येथे मॉडेल करिअर सेंटरची सुरुवात केली आहे. रोजगार इच्छुक उमेदवारांनी या मॉडेल करिअर सेंटरचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

            या मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची NCS पोर्टलवर नाव नोंदणी, करिअर मार्गदर्शन व समुपदेशन तसेच रोजगार मेळावे इत्यादी योजनांसाठी जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तथा मॉडेल करिअर सेंटर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा (संपर्क – श्री.प्रवीण बनकर, यंग प्रोफेशनल, मो.नं. 9823028871, दूरध्वनी क्रमांक 0233-2990383), असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अ‍ॅडव्हांटेज विदर्भ महोत्सवामुळे विदर्भ क्षेत्र उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025- खासदार औद्योगिक महोत्सवा’चे थाटात उद्घाटनमुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भ विकासाला गती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तींसाठी द्रोण पत्रावळी मशिन; शुक्रवारी होणार लाभार्थ्यांची निवड

महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट 

vishwatmaklokswamivarta

पानिपत शौर्य स्मारकासाठीचे भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात- अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे