vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डेहराडून, बडोदा, दिल्ली, बेळगाव, गोवा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डेहराडून, बडोदा, दिल्ली, बेळगाव, गोवा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव..

मुंबई, प्रतिनिधी: गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याबाहेर मराठीबहुल असणाऱ्या प्रदेशात पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे

गणेशोत्सवानिमित्त कलाकारांना महाराष्ट्र राज्याबाहेर देखील व्यासपीठ मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून २७ ते २९ ऑगस्ट, २०२५ दरम्यान वन संशोधन केंद्र डेहराडून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. उर्वरित कार्यक्रम ०१ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे तर ३ सप्टेंबर २०२५ रोजी के एम गिरी सभागृह, बेळगाव या सीमावर्ती भागात गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. सर सयाजीराव नगर वडोदरा गुजरात या ठिकाणी ४ सप्टेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. तसेच ५ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा या राज्यात मराठी बांधवांसाठी भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक…

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी-स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी प्रकाश महाजन

vishwatmaklokswamivarta

लातूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि  वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

जिल्ह्यात ७५१ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण