vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने..बुलढाण्यात मोफत थायरॉईड तपासणी शिबिर 3 सप्टेंबरला

वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने..बुलढाण्यात मोफत थायरॉईड तपासणी शिबिर 3 सप्टेंबरला

बुलढाणा : प्रतिनिधी

शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहे. वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत थायरॉईड तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 3 सप्टेंबर,, बुधवार रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा पत्रकार भवन, सैनिकी मंगल कार्यालयाजवळ, बस स्टॅन्ड समोर, बुलढाणा येथे होणार आहे.

थायरॉईड विकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेकांना याची जाणीव होत नाही. हायपरथायरॉईडीझम व हायपोथायरॉईडीझम ही दोन प्रमुख प्रकारची थायरॉईड विकारे असून त्यांची लक्षणे वजन कमी होणे, घाम येणे, झोप न लागणे, हात थरथरणे, जलद हृदयगती, चिंता व अशक्तपणा, थकवा, सुस्ती, वजन वाढणे, थंडी वाजणे, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, मासिक पाळीतील अडचणी, वंध्यत्व इत्यादी. या लक्षणांपैकी कुठलेही लक्षण जाणवल्यास नागरिकांनी या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. तपासणीसाठी येताना आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्यविषयक जागरूकतेस चालना देणारा असून, या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

कुटुंबाचा सामाजिक उपभोग:आरोग्य’ सर्व्हेक्षण-सर्व्हेक्षण

vishwatmaklokswamivarta

बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला जिल्ह्यात सुरुवात

जलजन्य आजार नियंत्रणात: अमरावती जिल्ह्याचा ‘शून्य उद्रेक’ उद्देश यशस्वीपणे साध्य…

vishwatmaklokswamivarta

कंत्राटी स्वरुपात मानसोपचार तज्ञ पदाकरिता इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

सशक्त बालक हीच देशाची खरी संपत्ती;संपूर्ण समाज निरोगी व सशक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ- सुदृढ बालकांसाठी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

हिंद-की-चादर’ शताब्दी समागमासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज*लाखो भाविकांसाठी 15 दिवस व्यापक आणि मोफत वैद्यकीय सेवा..