vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन… 

महावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन…

जालना प्रतिनिधी: जालना शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या महावीर चौकात हिरवा झेंडा लावण्यात आल्याने जैन समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे. महावीर चौक हा जैन समाजासाठी धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठिकाण असून, येथे भगवान महावीर स्वामी यांचे स्मृतीचिन्ह आहे. या धार्मिक स्थळावर अशा प्रकारची अनधिकृत कृती झाल्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत.

यासंदर्भात जैन समाजाच्या वतीने जालना महानगरपालिका आयुक्त, मा. पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस स्टेशन तसेच मा. पोलीस अधीक्षक जालना यांना स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली आहेत. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि.7 सप्टेंबर रोजी महावीर चौक परिसरात हिरवा झेंडा लावलेला आढळून आला आणि हा प्रकार शहरातील शांतता, सुव्यवस्था व सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येते.

सकल जैन समाज सेवा व सकल हिंदू समाजाच्या वतीने बोलताना अक्षय गोरंट्याल म्हणाले, “अलीकडेच आमच्या महावीर भगवान यांच्या स्मारक सेवापुतळा चौकात चुकीची घटना घडली. त्या ठिकाणी हिरवा झेंडा लावण्यात आला होता. तो आम्ही काढून टाकला असून, समाज व सकल हिंदू समाजाने गोमूत्राने पूर्ण परिसराची स्वच्छता करून पुन्हा आमचा झेंडा लावला आहे. यापूर्वीच आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार व अनेक निवेदनं दिली होती. आता या घटनेनंतर आम्ही महापालिकेतही निवेदन देणार आहोत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पुरावे मिळतील आणि त्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. पोलिसांना आमची एकच विनंती आहे की अशा घटना सतत घडू नयेत. मागील 1 तारखेलाही अशीच घटना घडली होती. त्या वेळी तत्पर कारवाई केल्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाचे आभार मानतो. मात्र फक्त सात दिवसांत पुन्हा दुसरी घटना घडली आहे. यावरून स्पष्ट होते की काही विपरीत बुद्धीचे लोक समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. सकल हिंदू समाज व सकल जैन समाज शांततेने व संयमाने मार्ग काढत आहेत. मात्र तिसऱ्यांदा अशी घटना घडली तर आम्हालाही विचार करावा लागेल की आम्ही शांत राहावे की कठोर भूमिका घ्यावी. हे विपरीत बुद्धीचे लोक कोणत्यातरी संघटनांचे प्यादे असल्याचे दिसते. तरीही, आजपर्यंत आम्ही संयमाने मार्ग काढला आहे. पण पुन्हा अशी घटना घडली, तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करू आणि कुणालाही माफ करणार नाही. शेवटी, प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. पण आमची भाषा समजत नसेल, तर यानंतर त्यांना त्यांचीच भाषा ऐकवावी लागेल.”

जैन समाजाने दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, सदर कृती भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 299 व 398 अंतर्गत दंडनीय आहे. त्यामुळे संबंधित दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाकडे महावीर चौकातून हिरवा झेंडा तात्काळ काढण्याची, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी परिसरात नियमित प्रशासकीय देखरेख व सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची, तसेच महावीर चौकाचे स्वच्छता, सौंदर्यीकरण व योग्य देखभाल सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे जैन समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शहरातील धार्मिक सलोखा अबाधित राहावा याकरिता प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी समाजाची अपेक्षा आहे. समाजाने स्पष्ट केले आहे की, या घटनेवर तत्काळ लक्ष न दिल्यास धार्मिक भावना दुखावल्या जाण्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

संबंधित पोस्ट

शिक्षा एवम जनसेवा संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शिरसाट यांची पैठण शहरातील पूरग्रस्त भागास भेट..

vishwatmaklokswamivarta

16 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित ; जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांची कारवाई नियमाचे उल्लंघन केल्याचे उघड 

१० जुलै’ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर 

जिल्ह्यात फेरफार अदालत,२२१० प्रकरणे निकाली..

vishwatmaklokswamivarta

जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा