vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

सांगली, प्रतिनिधी) : राज्याचे अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज मिरज तालुक्यातील तुंग आणि वाळवा तालुक्यातील आष्टा, कारंदवाडी येथे भेट देऊन 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांचे उद्‌घाटन करून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार राजशेखर लिंबारे आदि उपस्थित होते.

तुंग येथे तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या सामंजस्याने तयार करण्यात आलेल्या कृष्णानंद पाणंद रस्त्याचे उद्‌घाटन अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, वाळवा तालुक्यातील आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्यांचेही उद्‌घाटन श्री. खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रस्त्याची पाहणी करून त्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयामुळे पाणंद रस्ता झाला आहे. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता खुला केल्याबद्दल समाधान व्यक्त करून अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे व महसूल प्रशासनाचे आभार मानून सत्कार केला.

पूर्वी रस्ता नसल्याने त्रास होत होता. मात्र आता हा रस्ता झाल्यामुळे वहिवाट सुलभ झाली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी त्यांचे रस्ता होण्यापूर्वी व रस्ता झाल्यानंतरचे अनुभव कथन केले. शेतात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता उपलब्ध असणे हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. शेत व पाणंद रस्ते हे शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी व शेतातील यंत्रसामग्री नेण्यासाठी आवश्यक असलेले मार्ग आहेत. पाणंद रस्ते खुले झाल्यामुळे शेतीसाठी वाहतूक व दळणवळणाची सोय उपलब्ध होऊन शेतीमाल आणि यंत्रसामग्रीची वाहतूक करणे सोपे होत असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

00000

संबंधित पोस्ट

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त- पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तंबाखुमुक्ती जनजागृती बाईक रॅलीस प्रतिसाद

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बँकांनी शासकीय योजनांसाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 आताची मोठी बातमी – मुंबईकरांसाठी म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली!  

vishwatmaklokswamivarta