vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन

जालना,  (प्रतिनिधी) – भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर यांच्या तर्फे जालना शहरातील गुरु गणेश भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महा रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, चित्रप्रदर्शनी आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री.कैलासजी गोरंट्याल, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.

या प्रसंगी “पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस केवळ औपचारिकतेपुरता न राहता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करणे हीच खरी सेवा आहे, “नागरिकांनी अशा शिबिरांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, हेच समाजाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल, भाजपाच्या कार्यपद्धतीत समाजसेवा हेच केंद्रबिंदू असून या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सेवा व सहभागाची भावना दृढ होत आहे. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान करून आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

गेवराई तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराचा काळ्या यादीत समावेश- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकार रेशनच्या गव्हामुळे नाहीत– राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.