vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या डिजिटल डॅशबोर्डचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या डिजिटल डॅशबोर्डचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, प्रतिनिधी: राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विभागीय डिजिटल डॅशबोर्ड विकसित केला आहे. या डॅशबोर्डचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री श्री. सावे म्हणाले, या डॅशबोर्डच्या माध्यमातून विभागाच्या कामगिरीचे एकत्रित व रिअल टाईम चित्र कळेल. यामुळे विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख, पारदर्शकता आणि निर्णयप्रक्रियेची क्षमता अधिक सक्षम होईल.

डॅशबोर्डच्या माध्यमातून योजना-निहाय व जिल्हानिहाय निधी वितरणाचे विवरण, लाभार्थी व वापरकर्त्यांची संख्या, योजना कव्हरेज व प्रगतीचे अनुक्षण तसेच विभागीय कार्यप्रदर्शन निर्देशक यांचा तपशील पाहता येणार आहे. यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढेल, तसेच धोरण व कार्यक्रम व्यवस्थापनासाठी माहिती आधारित निर्णय घेणे शक्य होईल.

हा डॅशबोर्ड विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणणारा आणि नागरिकाभिमुख प्रशासन साधणारा टप्पा असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लिलावती रुग्णालयात अभिनेते सैफ अली खान यांची घेतली भेट*

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून अभियान यशस्वी करा – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

पनीरच्या नावाखाली ॲनालॉगचा वापर- आढळल्यास आता थेट कारवाई

भाजपा जालना महानगरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दौड ने साजरी..

vishwatmaklokswamivarta

रस्तासुरक्षाअभियान २०२६चा #नांदेड मध्ये शुभारंभ#अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta