vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी..!!

खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी..

राज्य प्रतिनिधी-बहुप्रतिक्षित खामगांव-जालना रेल्वे मार्गाच्या कामाला त्वरीत मान्यता प्रदान करावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैश्णव यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांची भेट घेऊन केली आहे.

            खामगांव-जालना हा रेल्वे मार्ग व्हावा अशी अपेक्षा बुलढाणा लोकसभा मतदार संघातील नागरिकांची आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रकल्प जलद गतीने पूण करण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या ५० टक्के खर्चाला मंजुरात प्रदान करुन हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे पाठविला आहे.

या रेल्वेमार्गाच्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन या प्रकल्पाला मंजुरात प्रदान करावी, अशी मागणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली आहे. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनीही सकारत्मकता दर्शविली असल्याची माहिती ना. जाधव यांनी दिली.

0000

संबंधित पोस्ट

धारावीतील ज्येष्ठांनी मांडली प्रदूषण मुक्त दिवाळीची संकल्पना…

vishwatmaklokswamivarta

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची सांगता कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस