vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी सक्षमीकरण कार्यालय सुरू

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी सक्षमीकरण कार्यालय सुरू

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ अधिक सुलभ व परिणामकारक पद्धतीने मिळावा यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्यात आले आहे. हे कार्यालय दि. ०१ सप्टेंबर, २०२५ पासून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत स्वेअरफिट होम, जीएसटी भवन समोर, वागळे इस्टेट रोड क्र. २२, ठाणे – ४००६०४ येथील तळमजल्यावर कार्यान्वित करण्यात आले आहे.

  या कार्यालयामार्फत दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, लाभ मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच समस्या निवारणासाठी सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी उपक्रमांचा योग्य लाभ घेता यावा, हा या कार्यालय स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे.

   जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी उज्वला सपकाळे यांनी सांगितले की, “दिव्यांग बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे सर्व दिव्यांग नागरिकांनी या कार्यालयाशी संपर्क साधून लाभ घ्यावा.”

00000

संबंधित पोस्ट

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

नैसर्गिक झऱ्यांची गणना; आपल्या भागातील झऱ्यांची माहिती कळवा-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन

त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान

पुणे शहरातील तीन ठिकाणांच्याअतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम चित्ररथास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दाखविली हिरवी झेंडी..

vishwatmaklokswamivarta