vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढायांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांची केली पाहणी..

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढायांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांची केली पाहणी..

 

         जालना, प्रतिनिधी): जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज बदनापूर तालूक्यातील शेलगाव या गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली. यावेळी श्री. लोढा म्हणाले की, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीनुसार योग्य पंचनामे करावे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत देण्यात येणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन, त्यांनी काळजी करू नये. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहचविण्यात येणार असल्याचेही श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार नारायण कुचे, उपविभागीय अधिकारी श्री. दौड, तहसिलदार, श्री. हेमंत तायडे, सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह शेलगाव येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.-*-*-*-

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतशेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी जुलै ते डिसेंबर-तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बांधावरच शंका समाधान अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी – जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

पाण्याविषयक तक्रारी 1800222309 टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याचे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचे आवाहन

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी