vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बांधावरच शंका समाधान अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी – जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बांधावरच शंका समाधान अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी – जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संख्या समाधान ,बी बियाणे ,खते त्याचप्रमाणे पीककर्ज प्रक्रिया, शेतरस्ता, इत्यादी विषयावरील तक्रारीवरील शंका, समाधान करण्यासाठी प्रत्येक विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

23 जून,सोमवारपासून सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत विविध विभागाचे अधिकारी, शेतकऱ्यांच्या गावात, शिवारात आणि बांधावर जाऊन भेट घेऊन चर्चा करणार आहेत. “अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी” या उपक्रमा अंतर्गत विविध प्रकारच्या तक्रारीचे शंका समाधान आणि निराकरण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. यामध्ये महसूल, ग्रामविकास, कृषी विभाग, भूमी अभिलेख, विविध बँकांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी कार्यालयात घेऊन येण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याकडेच जाऊन त्यांच्या बांधावर अधिकाऱ्याने अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेत रस्ता, इतर सुविधा ,मालकी हक्क, फेरफार, खत, बी बियाणांची उपलब्धता याविषयी संवाद साधला जाणार आहे .यामध्ये महसूल, कृषी ग्रामविकास, सहकार, भूमी अभिलेख ,वन विभाग, या विभागाचे सर्व अधिकारी तालुका निहाय नियोजन करून किमान प्रत्येकी 10 शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देणार आहेत. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आले आहे.

तालुका निहाय केलेल्या नियोजनासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी गावनिहाय होणाऱ्या भेटीचे नियोजन व त्याचे अहवाल याचे सादरीकरण जिल्हास्तरावर करण्याबाबतही निर्देशित करण्यात आलेले आहे.प्रत्येक गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, व संबंधित तहसील, पंचायत कार्यालय येथे कार्यरत असणारे कर्मचारी या अभियानाचा भाग असणार आहेत.

शेतकरी बांधवांना शासनाचा आपल्या पाठीशी असल्याचे विश्वास देण्यासाठी बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी योग्य ते कार्यवाही करणार आहेत. सदरील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सर्व विभागाने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

जीएसटी सुधारणा : आर्थिक सबलीकरणाचा नवा अध्याय!

vishwatmaklokswamivarta

चिखली नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे पंडितराव देशमुख; भाजपचे वर्चस्व…

vishwatmaklokswamivarta

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे -उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन

अलिबागमध्ये शिवजयंतीनिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम..

vishwatmaklokswamivarta

सैन्यदल अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी मोफत पूर्वप्रशिक्षण

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व वित्तमंत्री कनूभाई देसाई यांच्या उपस्थितीत डाईंग अँड पेगमेंट्स असोशिएशन अमृत महोत्सव साजरा करणार..