मराठी भाषेवर कुठलेही अतिक्रमण होणार नाही यासाठी सजग राहण्याचे आव्हान-कौतिकराव ठाले पाटील
जालना प्रतिनिधी : येथे मराठवाडा साहित्य परिषदेचे 82 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे होते तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, विषेश सत्कारमुर्ती सौ. रेखाताई बैजल, तर प्रमुख उपस्थितीत प्रा. दादा गोरे, कार्यवाहक आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुखे,उपाध्यक्ष, रामचंद्र काळुंखे, प्रा.गणेश मोहिते,प्रा.राम अग्रवाल,प्रा.गणेश अग्निहोत्री,सुभाष कोळकर,जालना शाखा मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष रविंद्र तौर,बाळासाहेब तनपुरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रसिद्ध लेखीका रेखा बैजल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठी भाषा व साहित्य समृद्ध करण्यासाठी तसेच मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी व मराठी भाषा राजभाषा असतांना इतर भाषेची सक्ती कशाला ? असा आक्रमक सवाल याप्रसंगी मांडून इतर भाषेला राज्यात विरोध करणे आवश्यक असल्याचे सांगितले.व मराठी भाषा टिकवण्यासाठी सजग राहण्याचे आव्हान स्विकारावे लागेल असे सांगितले.मराठवाड्याने अनेक नामवंत साहित्यिक महाराष्ट्राला दिले. सर्वाधिक पारतंत्र्यात राहिलेला मराठवाडा साहित्य क्षेत्रात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले! मसाप च्या कार्याचा आढावा घेतला व पुढील काळात या संस्थेचे कार्य पुढे नेण्यासाठी तरुणांनी पुढे यावे यासाठी आवाहन केले. जालना शाखा अध्यक्ष रविंद्र तौर यांनी प्रास्ताविक करताना जिल्ह्यातील मराठी साहित्यकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन मसाप चे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी जालना शाखे मार्फत होणार्या विविध उपक्रमाची माहीती दिली. प्रमुख अतिथी प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव बोलताना म्हणाले की मराठवाड्यातील मसाप ही मातृसंस्था असून पर्याय म्हणून अनेक संस्था या ठिकाणी उभा राहिल्या परंतु त्या टिकल्या नाहीत शुद्ध हेतूने काम करणारी मसाप सर्व समाज घटकांना घेऊन प्राचार्य कौतिकराव ढाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीने काम करीत आहे मसाप कडून समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत असे सांगीतले. दादासाहेब गोरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की जालना शाखेचे काम उत्तम असून आपल्या कार्य कक्षा वाढवल्या पाहिजेत नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.असे आवाहन प्रसिद्ध लेखिका रेखा बैजल यांनी सत्कारानंतर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. रंगनाथ खेडेकर तर केंद्रीय सदस्य सुभाष कोळकर यांनी आभार मानले.
दुपारच्या सत्रात जेष्ठ कवी राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. प्रा.ज्योती धर्माधिकारी यांच्या सूत्र संचलनाने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बसवाज कोरे,श्रीकांत गायकवाड, लक्ष्मीकांत दाभाडकर, रमाकांत कुळकर्णी,डॉ.सत्यशीला तौर,डॉ.प्रा.ज्योती धर्माधिकारी,सुचीता कुळकर्णी,विठ्ठलराव काष्ठे,अशोक पाठक,शिवाजीराव कायंदे,प्रभाकर शेळके, राजाराम जाधव, कृष्णा आर्दड,कल्याणी देशमुख, अजय देशमुख इ. कवी व कवियत्री यांनी आपले काव्य अत्यन्त उत्साहात सादर करून उपस्थित सर्व साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन केल्याबद्दल रविंद्र तौर व त्यांच्या कार्यकारिणीचे ठाले पाटील यांनी कौतुक केले. याप्रसंगी शिवकुमार बैजल,संतोष तांबे,संजीव कुळकर्णी,देवीदास फुलारी,सविता जाधव,मोईब कादरी, पंडितराव तडेगावकर, माजी अध्यक्ष मसापा प्रा.रमेश भुतेकर,प्राचार्य सुनंदा तिडके, प्रा.यशवंत सोनुने,डॉ.जगन्नाथ खंडागळे, बसवराज कोरे,प्रा.बबनराव दिरंगे,प्रा.नारायणराव बोराडे, अंकुशराव ेशमुख, गुलाबराव पाटील,सतिश तवरावाला,सोपानराव भांदरगे,शिवकुमार सोंळके, अॅड.विलास भुतेकर, सुरेश शर्मा,माऊली कदम,राजेंद्र गोरे, अशोक उबाळे, विलास झुंबड, सत्यनारायण काळे,रावसाहेब ढवळे,रामेश्वर लोया,रघुनाथ ताठे,सुभाष खंडागळे कल्याण बागल इ. मान्यवर तसेच मराठवाड्यातील मसाप शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.