vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

 रायगड-अलिबाग,I प्रतिनिधी:- सन 2025-26 या वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना https://hmas.mahait.org, या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरीता पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org, या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग येथे सादर करावेत असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड सुनिल जाधव यांनी केले आहे.

राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकाची मुदत दि.19 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 देण्यात आली होती. वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करावयाच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी झाल्याने या प्रवेश प्रक्रियेसाठी खालील विवरणपत्राप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याकरीताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- 12 वी नंतरच्या दिनांक व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून), प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि.30 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025, अर्ज छाननी करावयाचा कालावधी- दि.27 ऑक्टोबर ते दि.04 नोव्हेंबर 2025, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार प्रवेशाची अंतिम मुदत- दि.20 नोव्हेंबर 2025.

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र उदयोन्मुख तंत्रज्ञान निधी स्थापन करण्याचा निर्णय- उद्योग मंत्री उदय सामंतॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, गेमिंग विकासासाठी धोरण तयार करण्यात येणार प्रादेशिक मराठी आशय निर्माण करणाऱ्या स्टुडिओंना देखील स्वतंत्ररित्या प्रोत्साहन

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी किशन जावळे,राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

जव्हार अर्बन बँकेच्या नोकर भरतीसाठी सुधारित प्रस्ताव सादर करा – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

मान्सून कालावधीत यंत्रणांनी सज्ज राहावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*कृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम #‘ई-टपालवाला सेवा’जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना आता मिळणार जलद माहिती..

सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा