vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बँक ऑफ इंडिया रायगड विभागातर्फे सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभा संपन्न

बँक ऑफ इंडिया रायगड विभागातर्फे सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभा संपन्न

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-“सतर्कता हमारी साझा ज़िम्मेदारी Vigilance: Our Shared Responsibility” या थीमसह देशभरात 18 ऑगस्ट ते 17 नोव्हेंबर पर्यंत दक्षता जागरूकता सप्ताह पाळत आहे. या अंतर्गत रायगड विभागातील येणाऱ्या सर्व शाखांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी (24 सप्टेंबर 2025) रोजी ग्रामसभा संपन्न झाल्या.

झोनल मॅनेजर दीपन्विता साहनी व डेप्युटी झोनल मॅनेजर भरत सहाय यांच्या मार्गदर्शनानुसार बँक ऑफ इंडिया रायगड झोनतर्फे विविध ग्रामीण व निमशहरी शाखांमध्ये विविध शाखांच्या शाखा व्यवस्थापकांनी ग्रामसभा आयोजित केल्या होत्या. ज्यामध्ये ग्राहकांना फसवणुकीशी संबंधित माहिती देऊन जागरूक करण्यात आले. या बैठकीत ग्राहकांना ओटीपी शेअर करू नका, एटीएम पिन आणि सायबरलिंक शेअर करू नका त्याच बरोबर जास्त व्याज असणारे कर्ज घेऊन कर्जच्या विळख्यात अडकू नका असे सांगण्यात आले. ग्राहकांना कसे कसे फसवले जाते याबाबत संबंधित माहिती देण्यात आली.

००००००

संबंधित पोस्ट

नवीन 4 कामगार संहितांवर हरकती-सूचना सादर करण्याचे आवाहन

लातूरकरांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन’

येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुक स्वयंसेवकांना आवाहन

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा- नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे

राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी३१ जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज करावेत