vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

 सांगली, प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याचा दिनांक 3 नोव्हेंबर 2025 असा आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आरक्षण सोडत कार्यक्रमाचा टप्पा व टप्पा सुरू करण्याचा / संपविण्याचा दिनांक पुढीलप्रमाणे. प्रारूप आरक्षण – (१) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे – 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत. (२) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे – 8 ऑक्टोबर 2025 पर्यंत. (३) आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला [अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) बाबत] – 10 ऑक्टोबर 2025. (४) आरक्षणाची सोडत काढणे [नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) बाबत] जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी – 13 ऑक्टोबर 2025. प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिध्द करणे – 14 ऑक्टोबर 2025. हरकती व सूचना – जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी – 14 ऑक्टोबर 2025 ते 17 ऑक्टोबर 2025. प्राप्त प्रारुप आरक्षणावरील हरकती व सूचना आधारे अभिप्रायांसह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे – 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत. प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन आरक्षण अंतिम करणे – 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत. अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करणे – 3 नोव्हेंबर 2025.

00000

संबंधित पोस्ट

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा आराखडा तयार करावा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे *क्षेत्र, जातीनुसार मॅपिंग करावे *महिला, दिव्यांगाना लाभ पोहोचवा *उद्देशिकेचे प्रत्येक घरी वाटप करावे

मी मतदान करणार, तुम्हीही मतदान करा’, असे नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे सेल्फीव्दारे आवाहन

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 5 एप्रिल अर्जाची मुदत…

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत  जबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी            – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष – सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा 

प्राप्तिकर विभाग, नागपूरतर्फे प्राप्तिकर कायदा, 2025 संदर्भात “प्रारंभ–2026” जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन तंत्रज्ञानावर आधारित करदाता सेवा आणि सुलभ कर कायदे ऐच्छिक अनुपालन बळकट करतील”-डॉ.सिबिचेन के.मॅथ्यू,महासंचालक,एनएडीटी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करावापाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश…