vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनासाठी डायनींग टेबल दिले भेट *

वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनासाठी डायनींग टेबल दिले भेट *

 

चिखली प्रतिनिधी -: मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात, भोकर ता चिखली येथे प्रा पी जी सवडतकर यांनी सदिच्छा भेट दिली असता वृद्धाश्रमातील वृद्ध हे खाली बसून भोजन करतांना आढळून आले याची दखल घेत त्यांना भोजन करण्यासाठी दोन डायनींग टेबल व आठ खुर्ची भेट दिली आहे.

वृद्धाश्रमात निराधार बेघर घरातून काढून दिलेले नातेवाईक असून त्याचा सांभाळ करण्यास असक्षम आहे अशा वृद्धाना प्रशांत डोंगरदिवे व रुपाली डोंगरदिवे हे निरंतर सेवा देत असल्यामुळे सवडतकर परिवाराच्या वतीने छोटीशी मदत भेट दिली

तसेच ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व्दारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी सर्व सोईसुविधा सह निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. येथील वृद्धाना भोजन करण्यासाठी प्रा पी जी सवडतकर यांनी दोन डायनींग टेबल व आठ खुर्ची देऊन मदत केली आहे. तसेच चिखली परिसरातील दान दात्यानी मोठया मनाने समोर येऊन निराधार वृद्धाच्या सेवे करिता शक्य होईल ती भरीव मदत करून निराधार वृद्धाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन प्रा पी जी सवडतकर व युवराज भुसारी पाटील यांनी केले. तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा- अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने   

राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होणार

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु वितरीत..

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा नागरिकांसोबत साधणार संवाद..

vishwatmaklokswamivarta

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

15 हजारहून अधिक थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेत जमा केला 81 कोटी कर**अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी!सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध*