vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पैठण रस्त्यावरील रहदारीसाठी पर्यायी वाहतुक मार्ग

पैठण रस्त्यावरील रहदारीसाठी पर्यायी वाहतुक मार्ग

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ इ छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याठिकाणची रहदारी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दि.१८ पर्यंत ही वाहतुक याच पर्यायी मार्गाने होणार आहे.

रहदारीतील बदल याप्रमाणे- १. कचनेर-निजलगाव-बिडकीन डीएमआयसी- निजलगाव फाटा, बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी एन्ड्युरन्स कंपनीजवळून- शेकटा फाटा- बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाईल.

२. छत्रपती संभाजीनगर- निजलगाव फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर-निजलगाव फाटा-बिडकीन –शेकटा फाटा- एन्ड्युरन्स कंपनी जवळून- बिडकीन डीएमआयसी – निजलगाव मार्गे कचनेरकडे जातील.

३. वाळूज- शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जाणारी वाहने; वाळूज- शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- एनड्युरन्स कंपनी जवळून- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जातील

४. कचनेर- निजलगाव-बिडकीन डीएमआयसी- निजलगाव फाटा- बिडकीन- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादा मार्गे वाळूज कडे जाणारी वाहने; कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी- एनड्युरन्स कंपनी जवळून- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादा मार्गे वाळूजकडे जातील.

दि.१८ पर्यंत हे बदल लागू राहतील. प्रतिबंधीत केलेल्या मार्गावर वाहनांची ये- जा बंद करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून कार्यवाही– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

वनविभागाचे सौंदर्यीकरण,सशक्तीकरण आणि मजबुतीकरणावर विशेष भर– वनमंत्री गणेश नाईक

विधान परिषद प्रश्नोत्तरे-जल जीवन मिशन अंतर्गत योजनेतील प्रगतीपथावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करणार-पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

दलित आघाडीचे नेतृत्व मायावतींनी स्वीकारावे : रामदास आठवलेंचे सूचक विधान*

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलीस दलातील  ३ पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार व १ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती..

vishwatmaklokswamivarta