vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे रुग्ण सेवा द्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे रुग्ण सेवा द्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : सामान्य माणसाला विना विलंब आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने सर्व ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला आहे. या दवाखान्यांच्या ठिकाणी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, असे सांगत राज्यातील सर्व आपला दवाखाना केंद्रांचा सविस्तर आढावा पुढील १५ दिवसात घेतला जाईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व अन्य अनुषंगिक बाबींचा आढावा सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी नागरी आरोग्य अभियानाच्या सहाय्यक संचालक दिप्ती देशमुख यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, राज्यात मंजुरी देण्यात आलेल्या सर्व ठिकाणी आपला दवाखाना सुरू झाले पाहिजेत. तसेच आपला दवाखान्यांच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी याची सर्वदूर जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. विशेषतः समाज माध्यमे, एफएम रेडिओ यावर जनजागृतीसाठी भर द्यावा.सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, आपला दवाखान्यांच्या नियुक्त डॉक्टर्ससह अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करावे. यासाठी आतापासूनच त्याचे सूक्ष्म नियोजन करून प्रशिक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम आखावा. आपला दवाखाना सुरू असलेल्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित भेटी द्याव्यात. या ठिकाणी रुग्ण संख्या वाढली पाहिजे, यासाठीही प्रयत्न करावेत. आपला दवाखाना येथे आवश्यक सुविधासह अत्यावश्यक औषध साठाही उपलब्ध करून द्यावे.

आपल्या दवाखान्यात तपासणी केलेल्या रुग्णांची माहिती वरिष्ठ कार्यालयास अचूक देण्यात यावी. चुकीची माहिती देणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल. आपल्या दवाखाना मध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना त्यांचे मानधन वेळेत देण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री. आबिटकर यांनी केल्या.

 

००००००

संबंधित पोस्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्ष नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन बारामतीतील निवासस्थानी शोकसंवेदना व्यक्त केल्या

vishwatmaklokswamivarta

हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा  उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६वा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस नेते राहुलगांधी यांच्या दिल्ली तीन निवासस्थानी- इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिवसेना-भाजपची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसनं केलेल्या निंदनीय वक्तव्याचा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसनं पंतप्रधानांची लोकसभेत माफी मागावी, असं रिजिजू म्हणाले.

vishwatmaklokswamivarta