vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्यू आर कोड द्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले स्वेच्छा निधी संकलन

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्यू आर कोड द्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले स्वेच्छा निधी संकलन

ठाणे, प्रतिनिधी:- यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, व्यक्ती पुढे सरसावले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयही या मदतकार्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार रेवण लेंभे, सचिन चौधर, संदीप थोरात, अमोल कदम, प्रदिप कुडाळ, उज्वला भगत, निलेश गौड, मुकेश पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व प्रांत व तहसिल कार्यालय यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमासोबतच “एक हात पूरग्रस्तांच्या मदतीकरिता” याअंतर्गत “माणूसकीची दिवाळी” हा उपक्रम राबविला. यावेळी अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी “मुख्यमंत्री सहायता निधी” कक्षाच्या बँक खात्यावर क्यू आर कोडच्या माध्यमातून स्वेच्छा निधी थेट जमा केला. पहिल्याच दिवशी हा निधी जवळपास एक लाख रुपयांच्या आसपास पोहोचला. शासन आणि प्रशासन हे नेहमीच नागरिकांच्या कल्याणाकरिता अहोरात्र प्रयत्न करीत असते, त्यासाठी हे देखील कर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेतून केलेले एक छोटेसे योगदान असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी  म्हंटले .000

0

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनी अॅपद्वारे ई-केवायसी करावी-जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तीव्र प्रतिक्रिया; अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी तात्काळ पुढाकार,उपसभापती कार्यालयात अर्पण करण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली