vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

५० वे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन आणि परीक्षण दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना आवाहन ……

५० वे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन आणि परीक्षण दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना आवाहन ……

मुंबई (प्रतिनिधी ) : १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळ यंदा ७६ वर्ष साजरे करीत आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ५० वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने १९७६ पासून मराठी भाषेची वैभवशाली दिवाळी अंक प्रदर्शन परंपरा जपली जाते आहे. या उपक्रमात गोरेगाव येथील मराठी विचारधारा प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी प्रमाणे सहभागी होत आहे. या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अंक येत असतात. सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र मित्र स्मृती पुरस्कार तर आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी अंक, साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक, सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित सर्वोत्कृष्ट अंक, कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंक, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक, मनोहरपंत चिवटे स्मृती सर्वोत्कृष्ट आरोग्य विषयक अंक यासह स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून पारितोषिक देऊन मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येतो. स्पर्धा व प्रदर्शनासाठी आलेले हे अंक मुंबई-ठाणे शहरात प्रदर्शन आयोजित करून मांडले जातात. *सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी “जागल्यांचा लोकजागर” या ब्लॉगवरून दिवाळी अंकांचे परीक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच गेल्या ५० वर्षातील यावर्षापर्यंत प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांची संपर्क सूची मराठी भाषा दिवस साजरा करताना प्रकाशित करण्यात येणार आहे, हे अंक ग्रामीण भागातील शाळा-वाचनालयांना मोफत दिले जातात. दिवाळी अंकांच्या संपादक-प्रकाशकांनी २ प्रती – रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, घरकुल सोसायटी, रूम न. ६१२, ६ वा मजला, सेंच्युरी बाजार लेन, भुस्सा इंड. समोर, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रवींद्र मालुसरे ९३२३११७७०४ आणि सुनील कुवरे ९१६७३६४८७० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय डाक विभागाने नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी https:indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत,

01 मे ध्वजारोहण कार्यक्रमविभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते

प्रियदर्शनी कॉलनीत सिमेंट रोड चे भूमिपूजन प्रभागाचा विकास जनतेच्या विश्वासातून – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील बांद्रा कलानगर येथील जिओ मॉल च्या समोर एम एम आर डी ए फ्लावर च्या खाली अरुणोदय वॉकर्स असोसिएशन यांच्यातर्फे दर महिन्याप्रमाणे एका छोट्या खनि कार्यक्रमात माननीय संपादक लेखक अरविंद रिस बूड लिखित दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले 

vishwatmaklokswamivarta

इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत समाजसेवी संस्थांना पुरस्कार; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ