vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ५- औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याचे कामकाज सुरु झाले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात पदवीधर मतदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज वाटप व स्वीकृती करण्यात येत आहे,असे जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी ५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ यांनी कळविले आहे

दि.३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत पदवीधर मतदार हे ऑफलाईन किंवा ऑनलाईन मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करु शकता. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे नमुना अर्ज क्र.१८ कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्राप्त केल्यापासून दि.१ नोव्हेंबर २०२५ रोजी ३ वर्षे पूर्ण होणारा पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची मार्कशीट झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत, नावात बदल असल्यास गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र व भरलेला फॉर्म नं.१८ वरील सर्व कागदपत्रांसह तहसिल कार्यालयात साद करता येईल.

मुख्या निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाच्या वतीने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदार यांनी ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन मतदार नोंदणी करीता लिंक https://mahaelection.gov.in/citizen/login या लिंक वर जाऊन आपली वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. सदरील लिंकवर मोबाईल ओटीपी द्वारे नोंदणी करुन आवश्यक ती माहिती व कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करता येईल.जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची रितसर नमुना नं १८ पूर्णपणे भरुन किंवा वरीलप्रमाणे ऑनलाईन पोर्टलवरुन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

फलटण व कोरेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान .

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घाटन १२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहनलाभार्थ्यांचा लाभ डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार..

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदेपुढील तीन महिन्यात भरणार- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे