vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

     अमरावती, प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी (पण शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ) ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि मर्यादित शासकीय वसतिगृहांची जागा लक्षात घेऊन, अनेक विद्यार्थी निवासाच्या समस्येमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत 50 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.

  स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा आणि मर्यादित प्रवेशक्षमतेमुळे त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. तसेच, विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.

 

        पात्र विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर त्वरित ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित प्रत सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती यांच्या कार्यालयात 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करावा.

  अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय, अमरावती (दूरध्वनी क्रमांक 0721-2661261) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

म्हाडाची 1 ऑक्टोबर रोजी सोडत

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सर्व यंत्रणांनी कामे प्रस्तावित करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न,- सन 2025-26 साठी 632 कोटी, 29 लाखांचा निधी मंजूर- वर्गखोल्या बांधकामे, दुरूस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देश- प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्रासाठी राज्य स्तरावर बैठक घेणार

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे निर्देश

विभागातर्फे खरीप हंगामाकरिता रासायनिक खत व भात बियाणांचे नियोजन..