vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

सांगली, प्रतिनिधी) : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी सांगली येथे व शनिवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी उरूण ईश्वरपूरमध्ये पदयात्रेचे आयोजन केल्याची माहिती मेरा युवा भारत, सांगलीचे जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हा कार्यक्रम आणि उपक्रम माय भारत पोर्टलवर होत आहे. या पोर्टलवर नोंद करून जिल्ह्यातील नागरिकांनी या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होऊन सक्रियपणे सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे.

पहिली “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या ठिकाणी समाप्त होईल. तसेच दुसरी जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वा. उरूण ईश्वरपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी काढण्यात येणार आहे.

मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जाणार आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात या दोन “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” आयोजित केल्या जात आहेत.

      या पदयात्रेसोबत स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती मोहीम, सरदार पटेल यांच्या विचारावर चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजित केल्या जाणार आहेत. या उपक्रमात जिल्हा प्रशासन, माय भारत, शाळा, महाविद्यालय, स्थानिक युवा संघटना, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि भारत स्काऊट गाईड युनिट्स यांचा सहभाग असेल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सरदार 150 एकता अभियान· विविध उपक्रमाचे आयोजन· ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजभवनचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार केलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन…

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान‘दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्न; विकासकामांना गती देण्याचे निर्देश

भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना*पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर खासदार संतप्त; खोट्या अहवालांचा भांडाफोड करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी*