vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

व्हाईस ऑफ मीडियाला मिळणार दोन नवे जिल्हाध्यक्ष!कृष्णा सपकाळ यांनी सोपवला प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्केंकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा…

व्हाईस ऑफ मीडियाला मिळणार दोन नवे जिल्हाध्यक्ष!कृष्णा सपकाळ यांनी सोपवला प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्केंकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा…

बुलडाणा प्रतिनिधी-पत्रकारांची जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियामध्ये संघटनात्मक बदलाचे वारे वाहत आहेत. बुलढाणा जिल्ह्याला आता नव्याने नव्या रचनेनुसार दोन जिल्हाध्यक्ष मिळणार आहेत. पंढरपूर येथे १५ आणि १६ डिसेंबरला व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत असून या अधिवेशनात नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा होणार आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे कृष्णा सपकाळ यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाचे संघटन दिवसेंदिवस वाढत आहे. पत्रकार आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी व्हॉईस ऑफ मीडिया काम करत असून जगभरातील ५१ देशांमध्ये संघटनेचे काम चालते. बुलडाणा जिल्ह्यातही सर्वात मोठी पत्रकार संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत कृष्णा सपकाळ यांनी संघटनेत जिल्हा कार्याध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, मात्र आता राजकीय क्षेत्रातील जबाबदारीमुळे त्यांनी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्या सक्षम व्यक्तीकडे देण्यात यावी अशी विनंती त्यांनी प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्याकडे केली होती. त्यावर राज्य कार्यकारिणीच्या कोअर कमिटीत चर्चा झाल्यानंतर आता सपकाळ यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्याकडे सोपवला आहे.

संघटना सर्वोच्च: कृष्णा सपकाळ,आतापर्यंत व्हाईस ऑफ मीडियाने खूप ओळख दिली. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी काम करता आले. मात्र आता राजकीय क्षेत्रातील जबाबदारीमुळे संघटनेच्या कामाकडे अपेक्षित वेळ देता येत नाही. त्यामुळ ही जबाबदारी नव्या व्यक्तीकडे सोपवली पाहिजे, संघटनेसाठी अधिक वेळ देणाऱ्या व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवली पाहिजे या हेतूने राजीनामा दिल्याचे कृष्णा सपकाळ यांनी सांगितले. यापुढेही व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेत सदस्य या नात्याने कार्यरत राहणार आहे, कारण संघटना सर्वोच्च आहे असेही ते म्हणाले..दोन नव्या जिल्हाध्यक्षांची पुढील आठवड्यात घोषणा: अनिल म्हस्केकामाच्या अधिकच्या व्यापामुळे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्याची विनंती कृष्णा सपकाळ यांनी केली होती. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय राहिली आहे. यापुढेही ते संघटनेत कार्यरत राहणार आहेत. त्यांचा राजीनामा प्राप्त झाला असून आता नव्या रचनेनुसार पंढरपूर येथील राज्य अधिवेशनात दोन नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले…

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 28.54 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 5500 क्युसेक्स तर वारणा धरणातून 8530 क्युसेक्स विसर्ग सुरू

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती

सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हाप्रशासनाचे महत्त्वाचे पाऊल व्हॉट्सॲप चॅटबॉट’द्वारे मिळणार नागरिकांना माहिती आणि सेवा

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या संरक्षण उत्पादन धोरणामुळे देशाचे खरे ‘डिफेन्स क्लस्टर’ हे महाराष्ट्र आणि पुण्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश