vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

रायगड-अलिबाग प्रतिनिधी:- किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या मार्फत जिल्हा पणन अधिकारी, रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी पणन हंगाम 2025-2026 करिता धानाची (भाताची) खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील दि.04 नोव्हेंबर 2025 शासन निर्णयान्वये भात खरेदीचा धान-खरीप पणन हंगाम कालावधी दि.03 नोव्हेंबर 2025 ते दि.31 मार्च 2026, तर भरडधान्य खरीप पणन हंगाम कालावधी दि.01 डिसेंबर 2024 ते दि.28 फेब्रुवारी 2026 असा असेल. तर रब्बी पणन हंगाम केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार राहील.

भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उताऱ्याची व गाव नमुना 8(अ) ची छायाकिंतप्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या 7/12 उतारानुसार पीकाखालील क्षेत्र,या वर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी), पीकाचे सरासरी उत्पादन या सर्व बाबी विचारात घेऊन, धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल.

धानाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरिता खरेदी केंद्रावर भात ‍विक्रीकरिता आणताना प्रत्येक शेतकऱ्यांनी सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुक आणणे आवश्यक आहे. तसेच रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान/ भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबधित शेतकऱ्यांचीच राहील.धानाच्या आधारभूत किंमती पुढीलप्रमाणे:  भात सर्वसाधारण-2 हजार 369 रुपये प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 369 रूपये प्रति क्विंटल रक्कम अदा करण्यात येईल. भात (अ ग्रेड)- 2 हजार 389 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 389 रूपये प्रति क्विंटल रक्कम अदा करण्यात येईल.

भरडधान्य-ज्वारी (संकरित)- 3 हजार 699 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 3 हजार 699, ज्वारी (मालदांडी)- 3 हजार 749 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 3 हजार 749, बाजरी- 2 हजार 775 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 775, मका- 2 हजार 400 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 400, रागी- 4 हजार 886 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 4 हजार 886.

आधारभूत किमत योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या विनिर्देशात बसणारे FAQ दर्जाचेच धान । भरडधान्य खरेदी करण्यात येईल केंद्र शासनाने पणन हंगाम 2025-26 करीता आर्द्रता अधिकतप प्रमाण धानासाठी 17% विहित केलेली आहे. विहित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता आढळल्यास धान/भरडधान्य खरेदी करण्यात येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जास्त ओलसर, बुरशीयुक्त धान/भरडधान्य खरेदी करु नये. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवे धान/भरडधान्य खरेदी केले जाईल याची याची अभिकर्ता संस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी,

धान स्वच्छ व कोरडे असून ते विक्री योग्य (मार्केटेबल) असल्याचो अभिकर्त्यांनी खातरजमा केल्यावर भाताची खरेदी करयांत येईल. धान खरेदी करताना धान स्वच्छ कोरडे असावे, आधारभूत किमती खरेदी योजनेंतर्गत शासनाने निर्धारीत केलेल्या धानाच्या आधारभूत किमती, दर्जा, खरेदी केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यास आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागावर प्रसिध्दी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादीत झालेले नवे धान/भरडधान्याची खरेदी करण्यात येईल.

खरेदी केलेल्या धान्/भरडधान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान/भरडधान्य खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील 2 दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे.

भात खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहिती जिल्हा पणन अधिकारी रायगड संबंधित तहसिलदार/ गट विकास अधिकारों पंचायत समिती तसेच उप अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सह. संस्था/ खरेदी विक्री संघ/सह.भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध राहील.

अलिबाग तालुक्यातील शिरवली येथील भुवनेश्वर सहकारी भात गिरणी लि., नांगरवाडी मालाडे येथील नवजीवन शेती अभिनव सेवा सह.संस्था लि., झिराड येथील अलिबाग तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि., रामराज येथील विरेश्वर शेतकरी लाभार्थी सामाईक संयुक्त शेती सहकारी संस्था लि., चोंढी येथील किहीम विभाग सहकारी भात गिरणी लि., रेवदंडा आणि बोर्ली मांडला येथील दत्तकृपा भाजीपाला सह.संस्था मर्या.पेण तालुक्यातील पेण,बोर्झे,वडखळ, कामार्ली,वढाव, वरसई पेण तालुका सहकारी ख.वि.संघ लि. पेण, शिर्कीचाळ येथील अदिती ऑग्रो प्रोडयुसर कं.लि.पनवेल तालुक्यातील मार्केटयार्ड पनवेल-1 येथील पनवेल सहकारी भात गिरणी लि.,खालापूर तालुक्यातील चौक व खालापूर येथील नेताजी सह.भात गिरणी लि.,

कर्जत तालुका शेतकरी सह.खरेदी विक्री संघ लि. दहिवली, वैजनाथ, कडाव, कशेळे येथील कशेळे सहकारी भात गिरणी लि., कर्जत तालुक्यातील नेरळ येथील नेरळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.सुधागड तालुक्यातील सुधागड तालुका खरेदी विक्री संघ, परळी, पाली, पेडली,नाडसूर, बल्लाळेश्वर नाविन्यपूर्ण सर्व सेवा सहाकारी संस्था बी पाली,सुधागड शेतकरी उत्पादक सहकारी संस्था लि.वाघोशी, श्रीराम ना.वि.सर्व सेवा सह.संस्था झाप.

रोहा तालुक्यातील भैरवनाथ दूध उत्पादक सहकारी संस्था लि., यशवंतखार, रोहा, कोलाड आणि चणेरा व मारुती प्रसाद भाजीपाला सहकारी संस्था लि.शेणवई, मेढा.

श्रीवर्धन तालुक्यातील रानिवली वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि. रानवली, सायगाव, बोर्ली. माणगाव तालुक्यातील माणगाव, चांदोरी तळेगाव, ता.शेतकरी सह खरेदी विक्री संघ लि., महाड तालुक्यातील महाड तालुका शेतकरी सहकारी ख.वि.संघ लि., पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर तालुका सहकारी ख.वि. संघ लि.मु.पो.पोलादपूर आणि देवळे येथील दत्तकृपा महिला औ.उ. सहकारी संस्था लि. व म्हसळा तालुक्यातील म्हसळा ता. सह.खरेदी विक्री संघ ‍लि.मु.पो.म्हसळा अशा एकूण 46 केंद्रांना पणन हंगाम 2025-2026 मधील धान खरेदीकरिता मंजूरी देण्यात आली आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार- माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगारमेळावामेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मंत्री अतुल सावे .

vishwatmaklokswamivarta

कोकण विभागातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, मुंबई (उपनगर), पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सार्वजनिक ठिकाणीसीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार– गृहराज्यमंत्री योगेश कदम

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…