vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आदिवासी उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

आदिवासी उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

     अमरावती, प्रतिनिधी): आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती येथे विविध शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी आदिवासी उमेदवारांना विनामूल्य पूर्व-प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सत्राचा प्रशिक्षण कालावधी १ डिसेंबर 2025 ते 15 मार्च 2026 असा साडेतीन महिन्यांचा आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा हजार रुपये विद्यावेतनही देण्यात येणार आहे.

    प्रशिक्षणात गणित, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचे मार्गदर्शन केले जाईल. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य दिला जाईल. तसेच, प्रशिक्षणस्थळी मोफत अभ्यासिका आणि आवश्यक पुस्तके उपलब्ध आहेत.

   उमेदवार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा. वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे. किमान एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणीकृत असावे.

    इच्छुक व पात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत ‘आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, परतवाडा’ या कार्यालयात सादर करावेत. उमेदवारांच्या निवडीसाठी सोमवार, दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी 07223-221205 किंवा 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

00000

संबंधित पोस्ट

हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻

नीट-युजी फेरपरीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जिल्ह्यात 10 परीक्षा केंद्रे, 4572 परीक्षार्थी- सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना- केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात

जंतर-मंतरवर ‘हिंदू देवतांचा अवमान आणि ‘हेट स्पीच’ कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करा !- हिंदु जनजागृती समिती व सर्वोच्च न्यायालयातील वकीलांची मागणी

फिनलँडचे राष्ट्रापती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव