vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद, ठाणे येथे नशामुक्त भारत अभियानाची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जिल्हा परिषद, ठाणे येथे नशामुक्त भारत अभियानाची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियान (NMBA) च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद, ठाणे मुख्यालयात आज, दि. १८ नोव्हेंबर, २०२५ रोजी अधिकारी–कर्मचाऱ्यांकडून “नशामुक्ती शपथ” घेतली गेली.

जिल्हा परिषदेतील शपथ विधी कार्यक्रमास उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, समाज कल्याण विभाग प्रमुख तसेच कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी उज्वला सपकाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग संजय बागुल, कार्यकारी अभियंता (समग्र शिक्षा) युवराज कदम तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत, व्यसनमुक्त व निरोगी समाज घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.

“मी शपथ घेतो/घेते की, मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही. मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करीन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन. व्यसनमुक्त, निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू.” ही सामुहिक शपथ घेण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन व्यसनमुक्त जिल्हा घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.

000

संबंधित पोस्ट

ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

vishwatmaklokswamivarta

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव यांनी सपत्नीक दर्शन घेतले

राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सव’

vishwatmaklokswamivarta

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा

बुलढाण्यात जिल्हास्तर युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta