vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

क्रीडा स्पर्धेतून खिलाडु वृत्ती विकसित व्हावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

क्रीडा स्पर्धेतून खिलाडु वृत्ती विकसित व्हावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, प्रतिनिधी : क्रीडा स्पर्धेतून खिलाडु वृत्ती विकसित व्हावी. स्पर्धेतील यशस्वी व सहभागी स्पर्धकांनी पुढील स्पर्धेत अधिक चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

सांगली जिल्ह्यातील सर्व बालगृहातील मुले व मुलींच्या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी स्नेहांकिता वरुटे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते ॲड. तुषाल शिवशरण, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सहभागी स्पर्धकांना भविष्यकालिन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहित केल्याबद्दल बालगृहांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजयी संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने स्पर्धांचे आयोजन सीएसए या संस्थेच्या वतीने मोहिनी सावंत, गणेश शिंदे यांनी केले. ॲड. तुषाल शिवशरण यांनी अश्विनी शिवशरण यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमास मदत केली. पंच म्हणून अमशिद गुंडदळ व संतोष पाटील यांनी काम पाहिले.

         मुलींच्या स्पर्धेत वेलणकर अनाथ बालिकाश्रम यांनी तर मुलांच्या स्पर्धेत दादुकाका भिडे मुलांचे बालगृह व निरीक्षणगृहाच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या सामन्यांसाठी सौ. सुंदरबाई शंकरलाल मालू मुलींचे निरीक्षणगृह, भगिनी निवेदिता बालगृह, यशवंतनगर तसेच, शासकीय मुलींचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह मिरज इत्यादी संघ उपस्थित होते. उपस्थितांना बालविवाह रोखण्याच्या संदर्भात प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी, सर्व संस्थांचे अधीक्षक कर्मचारी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

राज्यस्तर शालेय बॉक्सिंगचा स्पर्धेचा थरार 26 सप्टेंबर पासून

vishwatmaklokswamivarta

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

नगरविकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा-छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर विजेते…

vishwatmaklokswamivarta

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 भारतीय पॅरा ॲथलीट्सची सुवर्ण कामगिरी!वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.पुरुषांच्या उंच उडीत भारताला दोन सुवर्णपदके